सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्या वतीने एमआयएमच्या खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन

By Appasaheb.patil | Published: March 6, 2023 04:06 PM2023-03-06T16:06:15+5:302023-03-06T16:07:07+5:30

 औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर या नामांतरास विरोध करणाऱ्या इम्तियाज जलील व औरंगजेबचे प्रतिमा नाचवणाऱ्या धर्मांध वृत्तीचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रतिकात्मक होळी करून निषेध करण्यात आला.

Burning effigy of MIM MP Imtiaz Jalil on behalf of Sambhaji Brigade in Solapur | सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्या वतीने एमआयएमच्या खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन

सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्या वतीने एमआयएमच्या खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन

googlenewsNext

सोलापूर :  औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर या नामांतरास विरोध करणाऱ्या इम्तियाज जलील व औरंगजेबचे प्रतिमा नाचवणाऱ्या धर्मांध वृत्तीचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रतिकात्मक होळी करून निषेध करण्यात आला.

१९८८ पासून महाराष्ट्रातील जनतेची मागणी होती की, औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याची मागणी होती. राज्य शासन व केंद्राने या मागणीस मंजुरी दिली असताना सुद्धा एम आय एम खासदार इम्तियाज जलील यांनी जाणून-बुजून जातीय तेढ निर्माण होईल या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर नामांतरास विरोध करून उपोषण केले आहे. या उपोषणामध्ये क्रूरकर्मा औरंगजेबाची प्रतिमा वागवून उदो उदो करण्यात आले होते या वृत्तीचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने व खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रतिमेचे दहन करून प्रतीकात्मक होळी करण्यात आली.

यावेळी संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, उपशहरप्रमुख सिताराम बाबर, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, आकाश कदम, राम चव्हाण, ज्ञानेश्वर पवार, विजय वाले, तेजस गायकवाड, महेश गिराम, अमोल सलगर, रमेश भंडारी, विजय बिल्लेगुरू, रुपेश कुमार कीरसावळगी, राजेंद्र माने, बबन डिंगणे, रमेश चव्हाण, शिवाजी यमगवळी, संजय मुळे, रवी किरण फुलारी, विश्वनाथ आमाने, नितीन होणमाने, प्रशांत एक्काड, मुन्ना कटारे, संजय काशिद, नवनाथ देठे इत्यादी उपस्थित होते.

Web Title: Burning effigy of MIM MP Imtiaz Jalil on behalf of Sambhaji Brigade in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.