पाच बोटी जाळून केल्या नष्ट

By admin | Published: July 17, 2014 12:48 AM2014-07-17T00:48:36+5:302014-07-17T00:48:36+5:30

महसूलची कारवाई; प्रांताधिकाऱ्यांच्या मोहिमेला यश

Burning five boats destroyed | पाच बोटी जाळून केल्या नष्ट

पाच बोटी जाळून केल्या नष्ट

Next


मंद्रुप/सोलापूर : अवैध वाळू उपसा करणाऱ्या पाच यांत्रिक बोटी ताब्यात घेऊन गॅसकटरच्या साहाय्याने त्या नष्ट करण्यात आल्या. महसूल पथकाच्या या कारवाईत २० लाखांची हानी करण्यात आली. यामुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
सोलापूरचे उपविभागीय अधिकारी श्रीमंत पाटोळे आणि दक्षिण सोलापूरचे तहसीलदार बाबुराव पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धडक कारवाईची मोहीम राबविली. त्यांनी लवंगी येथे वाळू उपसा करणारी यांत्रिक बोट पोलिसांच्या मदतीने जप्त केली. गॅसकटरच्या साहाय्याने ती नष्ट करुन जाळून टाकली. उर्वरित अवशेष नदीपात्रात फेकून दिले. या कारवाईचा लाभ उठवून वाळू वाहतूक करणारे ट्रक पळवून नेण्यात आले.
कारकल येथे महसूल पथकाने मोर्चा वळविला. पथकाचा सुगावा लागताच वाळू उपसा करणाऱ्या चार यांत्रिक बोटी तस्करांनी कर्नाटक हद्दीत पळवून नेल्या. त्यांची ही नेहमीची पद्धत यावेळीही वापरण्यात आली. मात्र उपविभागीय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी मोठ्या जिद्दीने कर्नाटक हद्दीतून महाराष्ट्राच्या हद्दीत आणल्या.
या मोहिमेत मंडल अधिकारी ए. एम. पटेल, शिपाई रऊफ बिराजदार, रवी नष्टे, चार पोलीस कर्मचारी व पाच कोतवालांनी भाग घेतला.
----------
२० लाखांची हानी
गॅसकटरच्या साहाय्याने त्याची तोडफोड करुन पेटवून दिल्या. यांत्रिक बोटींची किंमत प्रत्येकी चार लाख असून, आजच्या कारवाईत वाळू तस्कराची २० लाखांची मालमत्ता नष्ट करण्यात आली.
सोलापूरचे उपविभागीय अधिकारी श्रीमंत पाटोळे आणि दक्षिण सोलापूरचे तहसीलदार बाबुराव पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाची कारवाई.

Web Title: Burning five boats destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.