नक्षलवाद्यांच्या पुतळ्याचे भाजपतर्फे पंढरपूरात दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 13:19 IST2018-06-12T13:19:16+5:302018-06-12T13:19:16+5:30

नक्षलवाद्यांच्या पुतळ्याचे भाजपतर्फे पंढरपूरात दहन
पंढरपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नक्षलवाद्यांचा खात्मा करणाºया पोलीस अधिकाºयांना नक्षलवाद्यांनी निनावी पत्राद्वारे दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ पंढरपूर भाजपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर नक्षलवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
यावेळी मुर्दाबाद! मुर्दाबाद! नक्षलवादी मुर्दाबाद! अशा घोषणा दिल्या जात होत्या. गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील जांबाज पोलीस अधिकाºयांनी सुमारे ४० नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. याचा राग मनात धरून काही नक्षलवाद्यांनी निनावी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतपूर्व पंतप्रधान राजीव गांधी यांच्याप्रमाणे घातपात घडवून हत्या करू, अशी धमकी दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या कुटुंबीयांनाही धमकी देणारे निनावी पत्र थेट मंत्रालयात आल्याने खळबळ उडाली आहे.
यावेळी शहराध्यक्ष संजय वाईकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष विदुल अधटराव, सरचिटणीस कैलास कारंडे, सुरेंद्र कवठेकर, डॉ. शशिकांत धायतडक, महिला आघाडी अध्यक्षा अपर्णा तारके, राम चौगुले, शाम तापडिया, उमेश ढोबळे, डॉ. प्राजक्ता बेणारे, पार्थ बेणारे, डॉ. अक्षय देशपांडे, अक्षय कदम, व्यापारी सेलचे नितीन करंडे, शशिकांत सुगंधी, अशपाक नदाफ, संजय पालकर, आनंद कुलकर्णी, आनंद नगरकर, हर्षदा नगरकर, राधा परदेशी, पूर्वा पांढरे, अंजली भोरकर, प्रियंका भंडारे, वंदना भंडारे, वैष्णवी जोशी, शुभम कमले, युवा किरण खडाखडे, कुणाल कोरे, धनंजय निंबाळकर, योगेश सावंत, योगेश नायर, प्रशांत धुमाळ, विकास फुले, सुरेश खोबरे, प्रथमेश कदम, मुबीन बागवान, सचिन भोरकडे, सुमित पवार, आनंद घोडके, भारत कोरे, अमित वाघमारे, सचिन अधटराव, सोमनाथ कांबळे, राम अडसूळ, सुभाष नेहतराव, भैय्या कोळी, इस्लाम बागवान, मन्सूर बागवान उपस्थित होते.