कुरूल येथे जनहितने ऊर्जामंत्र्यांचा जाळला पुतळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:21 AM2021-03-15T04:21:34+5:302021-03-15T04:21:34+5:30
कुरूल : संतप्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कुरूल (ता. मोहोळ) येथे जनहितच्या वतीने निषेध करत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा पुतळा ...
कुरूल : संतप्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कुरूल (ता. मोहोळ) येथे जनहितच्या वतीने निषेध करत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा पुतळा जाळला.
यावेळी देशमुख म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील शेतकरी कोरोना, महागाई, अतिवृष्टी, लॉकडाऊन या कारणामुळे अडचणीत आले आहेत. अशावेळी शेतकऱ्यांना धीर देण्याऐवजी त्यांची घरातील आणि शेतातील वीज कापून अंधारात ठेवण्याचे काम आघाडी सरकारने सुरू केले आहे. अधिवेशन काळात एकीकडे उपमुख्यमंत्री म्हणतात वीज कनेक्शन तोडले जाणार नाही अन् दुसरीकडे ऊर्जामंत्री वीज तोडण्याचे आदेश देतात. महाविकास आघाडी लोकांना वेड्यात काढण्याचे काम करीत आहे. त्यामुळे आठ दिवसांत वीजतोडणीचा आदेश रद्द न झाल्यास मंत्रालयात घुसून किंवा ऊर्जामंत्र्याच्या बंगल्यात घुसून हातात रुमणे घेऊन जाब विचारू, असा इशारा महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत निकम, युवक अध्यक्ष नानासाहेब मोरे, किसनदेव जाधव, नागनाथ जाधव, सागर सलगर, शरद गुरव, पांडुरंग गुरव, सुधीर जाधव, बाळासाहेब जाधव, शिवाजी जगताप, योगेश सुरवसे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
----
१४ कुरूल
कुरूल येथे जनहितमर्फे ऊर्जामंत्र्यांचा पुतळा जाळताना प्रभाकर देशमुख.