डिझेलअभावी दोन दिवसांपासून बससेवा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:20 AM2021-03-20T04:20:48+5:302021-03-20T04:20:48+5:30
बससेवा ठप्प झाल्याने लांब पल्ल्याच्या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. अक्कलकोट तालुक्याची लोकसंख्या, भौगोलिक स्थिती मोठी आहे. ...
बससेवा ठप्प झाल्याने लांब पल्ल्याच्या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे.
अक्कलकोट तालुक्याची लोकसंख्या, भौगोलिक स्थिती मोठी आहे. यामुळे ग्रामीण भागात नेहमी बस सोडणे अत्यंत गरजेचे असते. संपूर्ण तालुका शेतीवर अवलंबून असल्याने दळणवळण मोठी आहे. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून त्यांचीही गैरसोय होत आहे. यामुळे त्यांचे नियोजन कोलमडले आहे. एसटी स्टँडवर शेकडो प्रवासी थांबून आहेत.
कोट ::::::::::
डिझेलअभावी एसटी बससेवा काही प्रमाणात ठप्प झाली आहे. उत्पन्न कमी असल्यामुळे डेपोकडे आर्थिक अडचण निर्माण होत आहे. शुक्रवारी दुपारी ४ वाजेपर्यंत प्रश्न सुटण्याची शक्यता
आहे.
- रमेश म्हंता,
आगारप्रमुख, अक्कलकोट.
फोटो
१९अक्कलकोट-एसटी
ओळी
अक्कलकोट बसस्थानकात एस. टी.बसची वाट पाहत बसलेले प्रवासी.