महामार्गासाठी बसस्थानक हटविले, आता महामार्गाचे कामही अर्धवटच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:25 AM2021-09-23T04:25:09+5:302021-09-23T04:25:09+5:30
गेल्या चार वर्षांपासून पंढरपूर-विजयपूर महामार्गाचे काम सुरू असून, या कामादरम्यान तीन वर्षांपूर्वी राज्य परिवहन महामंडळातर्फे उभारलेले बसस्थानक काढून टाकले ...
गेल्या चार वर्षांपासून पंढरपूर-विजयपूर महामार्गाचे काम सुरू असून, या कामादरम्यान तीन वर्षांपूर्वी राज्य परिवहन महामंडळातर्फे उभारलेले बसस्थानक काढून टाकले आहे. या परिसरात प्रवाशांसाठी कुठलीही निवाऱ्याची व्यवस्था नाही. विशेषतः महिला प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. शिवाय हा परिसर छोटे-मोठे व्यावसायिक व भाजी मंडईने व्यापल्यामुळे प्रवाशांना निवारा, आडोसाही उरला नाही. त्यामुळे पूर्ववत बसस्थानक उभारण्याची मागणी प्रवासी नागरिकांतून केली जात होती. याशिवाय ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे रस्त्यालगतची गटारलाइन, साइडपट्ट्या, विद्युत सुविधा अशी अनेक कामे अपूर्ण असून, याकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.
यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, तालुकाप्रमुख तुकाराम कुदळे, उपप्रमुख तुकाराम भोजने यांचे मार्गदर्शन लाभले, तर विभागप्रमुख सुरेश रोंगे, प्रा. संतोष पवार, बंडू शिंदे, माणिक पवार, धन्यकुमार पाटील, विठ्ठल चौधरी, गणपत पवार, गणेश पाटील, पांडुरंग घोडके, अशोक जाधव, विजय पवार, दत्तात्रय मासाळ, विवेक जाधव, शिवाजी केंगार, पांडुरंग जाधव आदी उपस्थित होते.
.........
दोन तास वाहतूक ठप्प, वाहनांच्या रांगा
गावातील छत्रपती शिवाजी चौक परिसरात शेकडो नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने दोन तासाहून अधिक वेळ वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी मंडल अधिकारी सी. एन. घोडके, पोलीस स्टेशनचे बी. बी. पिंगळे, पोलीस पाटील महेश पवार यांनी तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्याशी संपर्क साधून संबंधित प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यानंतर सर्व विभागातील अधिकारी व ग्रामस्थांची २७ सप्टेंबर रोजी बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन तहसीलदार रावडे यांनी दिले.
220921\166-img-20210922-wa0007.jpg
शिवसेनेच्या वतीने मरवडे येथे रास्ता रोको आंदोलन