खरेदी-विक्री संघ मका खरेदी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:15 AM2020-12-07T04:15:52+5:302020-12-07T04:15:52+5:30

चालूवर्षी पुरेसा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात मक्याचे उत्पादन घेतले. या कालावधीत व्यापाऱ्यांकडून कमी दराने मका खरेदी ...

The buying and selling team will buy maize | खरेदी-विक्री संघ मका खरेदी करणार

खरेदी-विक्री संघ मका खरेदी करणार

googlenewsNext

चालूवर्षी पुरेसा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात मक्याचे उत्पादन घेतले. या कालावधीत व्यापाऱ्यांकडून कमी दराने मका खरेदी केली जात होती. यामुळे दि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड या संस्थेमार्फत हमीभावाने मका खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला. फेडरेशनकडून मिळणारा हमीभाव १८५० असल्याने शेतकरी फेडरेशन खरेदी केंद्र सुरू होण्याची वाट पाहत होते. नोंदणी केलेल्या ४०० शेतकऱ्यांची ७ डिसेंबरपासून मका खरेदी केली जाणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोट :::::::::::::::::::::::

सांगोला तालुका खरेदी-विक्री संघाकडून मका खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी हमाल, बारदान्यासह इतर भौतिक सुविधांची पूर्तता केली आहे. यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.

- तानाजी पाटील

संचालक, खरेदी विक्री संघ, सांगोला

Web Title: The buying and selling team will buy maize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.