मंत्रिमंडळ, प्रशासनात नियोजनाचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:22 AM2021-05-13T04:22:53+5:302021-05-13T04:22:53+5:30
कोरोना पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सावंत हे आज पंढरपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. ...
कोरोना पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सावंत हे आज पंढरपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा, वाढत असलेली कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या उपाययोजना याबाबत त्यांनी आढावा घेतला.
यावेळी सहसंपर्क प्रमुख शिवाजी सावंत, अनिल सावंत, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, साईनाथ अभंगराव, महावीर देशमुख, रवी मुळे, जयवंत माने, अनिल अभंगराव उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात ‘ब्रेक द चेन’ उपक्रम राबवित कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी मोहीम हाती घेतली, मात्र या मोहिमेला त्यांच्यासोबत प्रशासनात काम करणारे अधिकारीच हरताळ फासत आहेत. मुख्यमंत्र्यांनी घालून दिलेले नियम राज्यातील प्रशासन अधिकारी मोडत असल्याने राज्यात दररोज कोरोनाची संख्या वाढत आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास राज्यातील प्रशासन कमी पडत असून सगळीकडे सावळा गोंधळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
कोरोनाचा संसर्ग थांबवायचा असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेवटच्या कर्मचाऱ्यांसोबत ग्राऊंड लेव्हलला काम करावे लागेल. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करून नियमांचे पालन केले तरच कोरोना आटोक्यात येईल अन्यथा यापेक्षा गंभीर परिस्थितीशी सामना करावा लागेल, असे त्यांनी सांगितले.
फोटो
१२पंढरपूर०१
ओळी
कार्यकर्त्यांकडून कोरोनाचा आढावा अहवाल घेताना माजी मंत्री आ. तानाजी सावंत. त्याप्रसंगी शिवाजी सावंत, साईनाथ अभंगराव, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, अनिल सावंत आदी.