रोहित्र जळाल्यास नियंत्रण कक्षाला करा फोन; अवघ्या दोनच दिवसात दुसरा दिसेल शेतात, महावितरणचा उपक्रम

By Appasaheb.patil | Published: February 13, 2023 02:40 PM2023-02-13T14:40:34+5:302023-02-13T14:40:53+5:30

Solapur News:

Call the control room if the container burns; In just two days, another will be seen in the field, the Mahavitaran initiative | रोहित्र जळाल्यास नियंत्रण कक्षाला करा फोन; अवघ्या दोनच दिवसात दुसरा दिसेल शेतात, महावितरणचा उपक्रम

रोहित्र जळाल्यास नियंत्रण कक्षाला करा फोन; अवघ्या दोनच दिवसात दुसरा दिसेल शेतात, महावितरणचा उपक्रम

googlenewsNext

- आप्पासाहेब पाटील
सोलापूर : रब्बीच्या हंगामात शेतीपंपाच्या वीज मागणीत जशी वाढ होते तसा महावितरणच्या वीज यंत्रणेवर ताण येतो. परिणामी अतिभारामुळे रोहित्र जळतात. मागील ७० दिवसांत ३२७० रोहित्र जळाले होते. त्यातील ३२४० रोहित्र महावितरणने तातडीने बदलले. आता फक्त ३० रोहित्र बदलणे बाकी आहे. रोहित्र तातडीने बदलता यावे यासाठी शेतकऱ्यांनी रोहित्र नादुरुस्त होताच कंपनीच्या कंट्रोल रूमला फोन केल्यास अवघ्या दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या शेतात रोहित्र बसविण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणने दिली.

बारामती परिमंडल कार्यालयांतर्गत महावितरणची सातारा, सोलापूर व बारामती असे तीन मंडल कार्यालये आहेत. सोलापूर मंडलात ५५१०४, सातारा ३०६१७ व बारामती मंडलात ३९२२५ रोहित्र आहेत. सरासरी ७.४४ टक्के रोहित्र वर्षभरात नादुरुस्त होतात. अनधिकृत वीज भार, कॅपॅसिटरचा वापर टाळणे ही रोहित्र जळण्याचे प्रमुख कारणे आहेत. रब्बी हंगामात सर्वाधिक रोहित्र जळतात, असेही महावितरणने सांगितले.

हा आहे सोलापूर जिल्ह्यातील नियंत्रण कक्षाचा नंबर
जळालेले रोहित्र तातडीने बदण्यासाठी महावितरण प्रयत्नशील असून, रोहित्र जळताच शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर कार्यरत असलेल्या दैनंदिन नियंत्रण कक्षाला (कंट्रोल रूम) फोन करावा. जेणेकरून संबंधित रोहित्र तातडीने बदलणे शक्य होईल. नियंत्रण कक्षाचे क्रमांक सोलापूरसाठी ९०२९१४०४५५ हा नंबर आहे. या क्रमांकावर शेतकऱ्यांनी फोन केल्यास रोहित्र बदण्यासाठी त्वरित उपाययोजना केल्या जातील.'

कॅपॅसिटरचा वापर करा...
रोहित्र व कृषिपंप वाचवायचे असतील तर कॅपॅसिटरचा वापर करणे हा किफायतशीर उपाय आहे. कॅपॅसिटरमुळे वीजभार कमी होतो. मोटारीचे कंपन कमी होते. पाण्याचा विसर्ग वाढतो. रोहित्र व कृषिपंपाची कार्यक्षमता व आयुर्मान सुधारते. वितरण हानी टळून शेतकरी व कंपनी दोघांचाही फायदाच होतो व गैरसोयही टळते, असेही महावितरणने कळविले आहे.

Web Title: Call the control room if the container burns; In just two days, another will be seen in the field, the Mahavitaran initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज