कॉल केला की मोबाईलवर ऐकू येते खोकल्याची उबळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 10:29 AM2020-03-08T10:29:38+5:302020-03-08T11:21:53+5:30
सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजला सोलापूरकरांनी दिले उत्तर
सोलापूर : फोन केल्यावर 'खोकल्याची कॉलर ट्यून वाजते' अबे, अजून किती भीती दाखवाल बे....कुठं फेडाल ही पापं ?? असा मेसेज सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.
दोन दिवसापूर्वी सोलापुरात 'कोरोना'चा रुग्ण आढळल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या व्हायरल मेसेजच्या व्हायरसची एकच चर्चा सोलापुरात सुरू झाली. डॉक्टरांच्या पथकाने "तो' व्हायरस चीनमधल्या कोरोनाचा नाही, असे स्पष्ट केल्यानंतर ही चर्चा थांबली. पण त्यानंतर सोशल मीडियावर सोलापुरी किश्याच्या वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. मोबाईलवर संपर्क साधल्यावर सध्या खोकल्याची कॉलर ट्यून ऐकविण्यात येत आहे. खोकल्याची ही कॉलर ट्यून ऐकून सोलापूरकरांनी आपल्या नेहमीच्या शैलीत सोशल मीडियावर उत्तरे देण्यास सुरुवात केली आहे.
अबे, अजून किती भीती दाखवाल बे.... असा सोलापुरी स्टाइल मधील मेसेज सध्या सोशल मीडियावर फिरतो आहे. जगात कोरोना व्हायरसची भीतीदायक चर्चा होत असताना, सोलापूरकर मात्र किती धीटपणे अशा प्रसंगाला सामोरे जातात, याचे हे एक उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. त्यामुळे प्रशासनाची चिंता मिटली आहे. धन्यवाद सोलापूरकर...