मोबाईल विकायला ‘तो’ मैदानावर आला; पोलिसांच्या सापळ्यात अलगद अडकला

By विलास जळकोटकर | Published: March 31, 2024 06:43 PM2024-03-31T18:43:19+5:302024-03-31T18:43:38+5:30

तीन गुन्ह्यांचा छडा : एक लाखाचा मुद्देमाल जप्त

came to sell mobile phones; caught in the police trap | मोबाईल विकायला ‘तो’ मैदानावर आला; पोलिसांच्या सापळ्यात अलगद अडकला

मोबाईल विकायला ‘तो’ मैदानावर आला; पोलिसांच्या सापळ्यात अलगद अडकला

सोलापूर: जुनी मिलच्या मैदानावर चोरीचा मोबाईल विकण्यासाठी आल्याची खबर मिळाली अन् गुन्हे शाखेच्या पथकाने पद्धतशीर सापळा लावून त्याला पळून जाताना पाठलाग करुन पकडले. झडतीमध्ये त्याच्याकडे दोन मोबाईल, एअरपॉड असा १ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पथकाकडून रविवारी ही माहिती देण्यात आली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेने नाकाबंदीपासून ते शहरातील विविध भागामध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. दुपारी गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि श्रीनाथ महाडिक त्यांच्या सहकाऱ्यांसह खासगी वाहनातून गस्त घालताना त्यांना खबऱ्याकडून जुनी मिल परिसरातील करजगी कॉम्पलेक्सच्या मोकळ्या मैदानावर एक चोरटा चोरीचा मोबाईल विकण्यासाठी आल्याची माहिती मिळाली.लागलीच पथकाने घटनास्थळी पोहोचन सापळा लावला. खबऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार एक ४५ च्या आसपास वयाचा अनोळखी संशयास्पदरित्या वावरताना पथकाला दिसला.

पथकातील पोलीस त्याच्याजवळ जाताच तो पळून जाऊ लागला. त्याचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. नाव पत्ता विचारला असता उमेश बंडू उकरंडे (वय- ४५, रा. मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) अशी माहिती त्यानं दिली. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्या बॅकेत दोन मोबाईल, लॅपटॉप, इअर पॉड, विविध बँकांचे डेबीट, क्रेडिट कार्ड, आधार कार्ड मिळाले. अधिक चौकशी त्याने वरील मुद्देमाल चोरीचा असल्याची कबुली दिली.

पोलीस रेकार्डवरील माहिती तपासली असता या चोरट्यानं फौजदार चावडी, जोडभावी पेठ पोलीस ठाणे आणि लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वरील चोरी केल्याचे निष्पन्न झाले. अशा प्रकार तीन गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. त्यांनी १ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गर्दीत मौल्यवान साहित्य सांभाळा
बसस्थानक, रेल्वेस्टेशन यासह गर्दीची ठिकाणं हेरुन चोरटे किंमती साहित्यावर नजर ठेवून चोरी करतात. नागरिकांनी आपले मौल्यवान साहित्य जपावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: came to sell mobile phones; caught in the police trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.