विठ्ठलाच्या दर्शनास आलो, राजकीय बोलणार नाही - के. चंद्रशेखर राव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 11:04 AM2023-06-27T11:04:41+5:302023-06-27T11:06:40+5:30
K. Chandrasekhar Rao: आषाढी वारीच्या निमित्ताने मी पंढरपूरला जाणार आहे. पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेणार आहे, मात्र कोणत्याही परिस्थितीत राजकीय बोलणार नसल्याचे स्पष्टीकरण तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
सोलापूर : आषाढी वारीच्या निमित्ताने मी पंढरपूरला जाणार आहे. पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेणार आहे, मात्र कोणत्याही परिस्थितीत राजकीय बोलणार नसल्याचे स्पष्टीकरण तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे दोन दिवसांच्या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. ते साेमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोलापुरात दाखल झाले. त्यांच्यासोबत तेलंगणाचे मंत्री, खासदार, आमदार अशा ३०० गाड्यांसह ६०० हून अधिक लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीविषयी के. चंद्रशेखर राव यांना विचारले असता, त्यांनी बोलण्याचे टाळले.
मंगल कार्यालयात जेवणावळी
मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (केसीआर) हे स्वत: मंत्रिमंडळातील पंधरा सहकारी, खासदार, आमदार व अधिकारी असा मोठा फौजफाटा घेऊन सोमवारी सकाळी हैदराबाद येथून रस्ता मार्गाने निघाले. जवळपास ३०० वाहनांचा ताफा असून, धाराशिव जिल्ह्यातील मुरुम मोड येथील एका मंगल कार्यालयात त्यांनी दुपारचे भोजन घेतले. मागील दोन दिवसांपासून दीड हजार लोकांच्या भोजनांची तयारी सुरू होती. यासाठी खानसामे व अन्न प्रशासनाचे अधिकारीही येथे तळ ठोकून होते.