शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:34 AM2021-02-23T04:34:33+5:302021-02-23T04:34:33+5:30
चारीबाजूंनी शेतकरी अडचणीत आहे. एकीकडे राज्य शासन ठाकरे सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेत असताना वीज महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मात्र ...
चारीबाजूंनी शेतकरी अडचणीत आहे. एकीकडे राज्य शासन ठाकरे सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेत असताना वीज महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मात्र बेधडक कारवाई करत ट्रान्स्फॉर्मर बंद ठेवण्याची भूमिका घेतली आहे.
याबाबत वीजवितरण कंपनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता किमान चालू बिल तरी शेतकऱ्यांनी भरले पाहिजे, अन्यथा आम्हाला वीज तोडल्याशिवाय पर्याय नाही अशा शब्दांत खुलासा दिला.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोरोनाकाळात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे वीजबिल माफ करू असे पत्रकार परिषदेत व विधिमंडळात स्पष्ट केले होते, मात्र, कारणे वेगळी याप्रमाणे शासन वागत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रश्नात बोलायला तयार नाहीत. तो विषय काँग्रेसच्या खात्यातील मंत्र्याकडे असल्याचे सांगत राष्ट्रवादी या प्रश्नाला बगल देत आहे. भाजप- शिवसेना युतीच्या काळात शेतकऱ्यांची वीज कधीही तोडण्यात आली नव्हती मात्र आता थेट ट्रान्स्फाॅर्मर बंद करून संपूर्ण गाव अंधारात टाकण्याचे काम वीज मंडळाने सुरू केले आहे.
करमाळा तालुक्यात ३५ हजार कृषिपंपांचे कनेक्शन आहेत. सोमवारी सकाळपासून हे कनेक्शन बंद करण्यास सुरुवात केली आहे. करमाळा भागातील मांगी ट्रान्स्फाॅर्मर बंद करून वीजतोडणी सुरुवात केली आहे.
---संपूर्ण वीजबिल माफ करा
कोरोनामुळे शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले आहेत. लाखो रुपयांचा भाजीपाला रस्त्यावर फेकून द्यावा लागला. कुठेतरी आता शेतकरी सावरतोय तोच वीज कट करून शेतकऱ्याला या शासनाने शॉक दिला आहे. शेतकऱ्यांची वीजबिल भरण्याची क्षमता नाही. संपूर्णपणे वीजबिल माफ करावे, अशी मागणी सुजित बागल यांनी केली आहे.