प्रचार संपला... तोफा थंडावल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:22 AM2021-04-16T04:22:07+5:302021-04-16T04:22:07+5:30
या निवडणुकीत काही अपक्षांमुळेमुळे रंगत निर्माण झाली आहे. कोरोनामुळे मतदान पोलिंग किती होते, याबाबतची उत्सुकता कायम आहे. त्यासाठी प्रशासन ...
या निवडणुकीत काही अपक्षांमुळेमुळे रंगत निर्माण झाली आहे. कोरोनामुळे मतदान पोलिंग किती होते, याबाबतची उत्सुकता कायम आहे. त्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.
प्रारंभी ही निवडणूक बिनविरोध होईल असा अंदाज असताना सत्ताधारी महाविकास आघाडीसह भाजपनेही निवडणूक प्रतिष्ठेची करत तुल्यबळ उमेदवार दिले. तर या दोन पक्षांव्यतिरीक्त तब्बल १७ अपक्ष निवडणूक रिंगणात आपले नशीब अजमावत आहेत.
अपक्षांच्या जोरावर एकमेकांना शह देण्याची व्यूहरचना दोन्ही पक्षांनी आखली जात आहे. त्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून राज्य पातळीवरील मोठ्या नेत्यांनी मतदारसंघात तळ ठोकून प्रचार केला. अनेक आरोप प्रत्यारोप झाले. मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले होते.
राज्यातील मोठ्या नेत्यांनी सभा घेतल्यामुळे ही निवडणूक राज्यभर गाजली. दोन्हीकडून विजयाचे दावे- प्रतिदावे केले जात असले तरी निवडणुकीत उभे असलेले आणखी ३ प्रमुख अपक्ष उमेदवार व इतर १४ उमेदवार किती मते घेणार, त्याचा कुणाला फायदा- तोटा होणार यावर जय- पराजयचे गणित अवलंबून राहणार आहे. मात्र, प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता मतदानकडे लक्ष लागले आहे.
----
कोरोनाचा प्रादुर्भाव, प्रशासन सतर्क
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यभर वाढत आहे. प्रचार कालावधीतही अनेक ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. प्रचार थांबल्यानंतर आणखी रुग्ण सापडण्याची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोनाचे नियम पाळून जास्तीत जास्त मतदान करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वेगवेगळे नियम घालत खबरदारी घेतली जात आहे.
-----