शेतकऱ्यांची लूट करणारा जीआर रद्द करा : अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रुमणे मोर्चा काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2021 06:36 AM2021-10-01T06:36:30+5:302021-10-01T06:39:34+5:30
सोलापूर लोकमत न्युज
मंगळवेढा : शेतकऱ्यांच्या डाळिंब फळ पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे, तरी सुद्धा चुकीच्या निकषांमुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या घामातून भरलेला फळ पिक विमा मिळू शकत नाही. सरकारने तात्काळ ४५ मी मी पेक्षा जास्त पाऊस पडलेल्या प्रत्येक मंडळींची आकडेवारी घ्यावी व सरकारने शेतकऱ्यांना लुटणारा जीआर रद्द करावा व ४५ मी मी पेक्षा जास्त पाऊस पडलेल्या प्रत्येक मंडलाची भरपाई मंजूर करायला विमा कंपनीला भाग पाडावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी घेऊन रुमणे मोर्चा काढणार असल्याचे निवेदन जिल्हा संघटक युवराज घुले यांनी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना दिले आहे.
सरकारने फळ पिक विमा लावलेले निकष शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकणारे आहेत सरकारने फक्त विमा कंपनीच्या फायद्याचे निकष लावलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी मृग बहर चा डाळिंबी चा विमा भरलेला आहे त्या फळ पिकांचे तीन ट्रिगर केलेले आहेत पहिला ट्रिगर १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये २१ दिवसांचा पावसाचा खंड असल्यानंतर दुसरा फिगर १६ ऑगस्ट ते १५ ऑक्टोंबर २१ दिवसाचा पावसाचा खंड असल्यानंतर आणि तिसरा ट्रिगर १६ ऑक्टोंबर ते ३१ डिसेंबर फक्त या कालावधीमध्ये जास्त पाऊस तोही एक दिवसात ४५ ते ६० मी मी पाऊस झाल्यानंतरच फळपीक विमा मंजूर होणार आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने निकष लावून सरकारने दिवसाढवळ्या विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्याचा खिसा कापलेला आहे, तरी पीक विमा मिळेपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नसल्याचे जिल्हा संघटक युवराज घुले यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत अर्जुन मुद्गुल, प्रभू चंदन शिंदे, ,काका दत्तू व शेतकरी बांधव उपस्थित होते.