भोसे जिल्हा परिषद गटातील 'स्वाभिमानी' शेतकरी संघटनेची उमेदवारी ऊसतोड मजुराला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2022 04:00 PM2022-07-31T16:00:02+5:302022-07-31T16:00:40+5:30
राज्य कार्यकारिणीत उमेदवारीची घोषणा
मंगळवेढा : शेतकऱ्यांसाठी अहोरात्र झटणाऱ्या माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर नागरिकांचा विश्वास असल्याने मंगळवेढा तालुक्यात हाय होल्टेज लढत होणाऱ्या भोसे झेडपी गटातून आबा खांडेकर यांची उमेदवारी राज्य कार्यकारिणी बैठकीत जाहीर करण्यात आली आहे. यामुळे गटात इच्छुक असणारे साखर सम्राट अनिल सावंत यांच्याविरुद्ध ऊसतोड मजूर अशी लढत होण्याची चिन्हे आहेत.
आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणूकीबाबत पदाधिकारी शी संवाद साधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक कराड येथे संपन्न झाली याप्रसंगी ते बोलत होते. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ॲड. राहुल घुले व जिल्हा संघटक युवराज घुले यांनी आगामी निवडणूकबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी आगामी निवडणुकीबाबत चर्चा करून इच्छुक उमेदवारांची नावे दिली यामध्ये भोसे गटातून शिरनांदगीचे आबा खांडेकर याची उमेदवारी एकमताने जाहीर केली.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले, स्वाभिमानीच्या इच्छुक कार्यकर्त्यांनी आपापापल्या गटात, गणात सक्रिय रहावे नागरिकांशी संवाद साधून स्वाभिमानीची भूमिका स्पष्ट करावी. पक्ष आपल्या पाठीशी खंबीर राहील असे अभिवचन संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिले. यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष एडवोकेट राहुल घुले, जिल्हा संघटक युवराज घुले, अर्जुन मुद्गुल, आबा खांडेकर यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.