नोकरीच्या नियुक्त्या मिळालेले सोलापुरातील उमेदवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक
By Appasaheb.patil | Updated: September 24, 2022 14:20 IST2022-09-24T14:19:27+5:302022-09-24T14:20:10+5:30
शिंदे सरकारकडून आता मराठा आरक्षणाच्या निर्णयाची प्रतिक्षा

नोकरीच्या नियुक्त्या मिळालेले सोलापुरातील उमेदवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक
सोलापूर : राज्य सरकारच्या निर्णयामुळे मराठा समाजातील विविध खात्याअंतर्गत शासनाकडून १०६४ पदे भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये सोलापुरातील १०२ मुले आणि मुली यांना शनिवारी महावितरणकडून नियुक्तीपत्रे देण्यात आली.
दरम्यान, त्यानंतर सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवरायांना अभिवादन करण्यात आले. शिंदे सरकारच्या निर्णयामुळे मराठा समाजातील उमेदवारांना नोकरीमध्ये न्याय मिळाला असल्याचे सांगत राज्य सरकारच्या निर्णयाचे मिठाई वाटून स्वागत करण्यात आले. तसेच जल्लोषही करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर यावेळी पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.