उमेदवार, पॅनलप्रमुख गुंतले मोर्चेबांधणीत, तर कार्यकर्ते कागदपत्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:18 AM2020-12-23T04:18:49+5:302020-12-23T04:18:49+5:30

माळशिरस : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त हालचाली सुरू झाल्या आहेत. उमेदवार पॅनल प्रमुखांसह दिग्गज नेतेमंडळी बैठका, चर्चा व रणनीती आखण्यात ...

Candidates, panel heads involved in front formation, while activists in documents | उमेदवार, पॅनलप्रमुख गुंतले मोर्चेबांधणीत, तर कार्यकर्ते कागदपत्रात

उमेदवार, पॅनलप्रमुख गुंतले मोर्चेबांधणीत, तर कार्यकर्ते कागदपत्रात

Next

माळशिरस : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त हालचाली सुरू झाल्या आहेत. उमेदवार पॅनल प्रमुखांसह दिग्गज नेतेमंडळी बैठका, चर्चा व रणनीती आखण्यात गुंतले आहेत. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जात आहेत. मात्र त्यापूर्वी अर्जासाठी लागणारी कागदपत्रे काढण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करण्यासाठी विश्वासू कार्यकर्त्यांच्या खांद्यांवर धुरा दिली जाते. याशिवाय काही एकला चलो रेचा सूर लावत अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः आवश्यक ती कागदपत्रे जुळविण्यात व्यस्त झाले आहेत. याशिवाय उमेदवारांचा खर्चाचा ताळेबंद जुळवून प्रशासनाला द्यावा लागणार आहे. त्यादृष्टीने ही तयारी चालू झाली आहे. वॉर्डनिहाय रचनेनुसार उमेदवारांच्या प्रमाणात काही राखीव असतात. जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र, शौचालय असल्याचा दाखला, आपत्य दाखला, बेबाकी प्रमाणपत्र, माहिती खरी असल्याबाबत घोषणापत्र, मतदार यादी झेरॉक्स, मतदान ओळखपत्र याबरोबर खर्चाचा ताळेबंदच्या दृष्टीने तयारी चालू झाली आहे.

--

फोटो : २१ माळशिरस

विविध कागदपत्रे संकलनासाठी माळशिरस तहसील कार्यालयासमोर उडालेली झुंबड.

Web Title: Candidates, panel heads involved in front formation, while activists in documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.