अनगर शिवारात चक्क बांधावर गांजाची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:26 AM2021-07-14T04:26:10+5:302021-07-14T04:26:10+5:30
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहोळ पोलिसांचे डीबी पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना अनगर गावच्या शिवारात ...
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहोळ पोलिसांचे डीबी पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना अनगर गावच्या शिवारात एका शेतकऱ्याने लागवड करून तो गांजा विक्री करत असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलीस पथकाला मिळाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी पोलीस पथकासह अनगर येथील हनुमंत शिंदे यांच्या शेतात धाड टाकली. यात छापा टाकला असता हणुमंत धर्मा शिंदे (५५, रा. अनगर) यांनी शेताच्या बांधावर गांजाची झाडे लावून त्याची विक्री करीत असल्याचे आढळून आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक सायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, सहाय्यक फौजदार चंद्रकांत कदम, युसूफ शेख, पोलीस गणेश दळवी, पांडुरंग जगताप, मंगेश बोधले, रवींद्र बाबर, हरीष थोरात यांच्या पथकाने केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी तहसीलदार जीवन बनसोडे, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे व सरकारी पंच उपस्थित होते.
-----
बांधावर लावली झाडे
पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ५ ते ६ फूट उंचीची गांजाची तब्बल ६५ झाडे मिळून आली. त्याचे वजन ६६ किलो असून, तो गांजा जप्त केला. या गांजाचे बाजारमूल्य ६ लाख ८५ हजार ५०० असल्याचे पोलिसांनी सांगितले. पथकाने हा गांजा लागवडीबाबत हनुमंत शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे गांजाची झाडे जप्त करून त्यालाही ताब्यात घेतले.
फोटो ....