भोसेत द्राक्ष बागेत लावली गांजाची झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:23 AM2021-07-29T04:23:59+5:302021-07-29T04:23:59+5:30
करकंब : पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे माणिक मळ्यात द्राक्ष बागेत गांजाची झाडे लावल्याचा प्रकार करकंब पोलिसांनी उघडकीस आणला आहे. ...
करकंब : पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे माणिक मळ्यात द्राक्ष बागेत गांजाची झाडे लावल्याचा प्रकार करकंब पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक जळाेली चौकात आले असता यशवंत जनार्दन घोडके (रा. माणिक मळा, भोसे) याने स्वत:च्या द्राक्ष बागेत गांजाच्या वनस्पतीची लागवड केल्याची माहिती मिळाली. हे पथक यशवंत घोडके यांच्या शेतात दाखल झाले असता गांजाची रोपे लागवड केल्याचे निदर्शनास आली.
सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली. या कारवाईत सहायक फौजदार बिराजी पारेकर, सहायक फौजदार म. इसाक मुजावर, हवालदार नारायण गोलेकर, हवालदार धनाजी गाडे, हवालदार मोहन मनसावाले, महिला पोलीस मोहिनी भोगे, समीर शेख यांनी सहभाग नोंदवला. याप्रकरणी शेतकरी यशवंत जनार्दन घोडके याच्याविरुद्ध करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.