कॅनालमध्ये कार उलटून चालक ठार; दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:15 AM2021-07-08T04:15:59+5:302021-07-08T04:15:59+5:30
याबाबत जखमी महिला जिज्ञासा नारायण पायाळे (वय ३१, रा.गाडेगाव रोड सध्या पोलीस लाइन परांडा) या परांडा पोलीस ठाण्यात ...
याबाबत जखमी महिला जिज्ञासा नारायण पायाळे (वय ३१, रा.गाडेगाव रोड सध्या पोलीस लाइन परांडा) या परांडा पोलीस ठाण्यात कर्मचारी असून, त्यांनी शहर पोलिसात तक्रार देताच, भादंवि ३४४,२७९,३३७ व ३३८ प्रमाणे गुन्हा नोंदला आहे.
यात जखमी झालेली फिर्यादी परांडा पोलीस ठाण्यातील जिज्ञासा व तिची मुलगी श्रेया राहुल गायकवाड (वय ७) या जखमी झाल्या असून, वाहन चालक हा दवाखान्यात उपचारास नेण्यापूर्वी मयत झाला.
याबाबत अधिक महिती अशी की, यातील फिर्यादी महिला या कडकनाथवाडी येथे बहिणीकडे गेल्या होत्या. त्या रात्री मुलगी श्रेया हिच्यासह एमएच ०३ बीई ७४९२ या कारमधून परांड्याला जाण्यासाठी रात्री निघाल्या होत्या. त्या आगळगावमार्गे परांड्याकडे जाणाऱ्या बायपासवरून रात्रीच्या वेळी जात असताना, कार चालकांने समोरून येणाऱ्या वाहनास चुकवित असताना, त्याचा ताबा सुटल्याने कडेला असलेल्या कॅनालमध्ये उलटली. यात चालकाचा मृत्यू आणि दोघे जखमी झाले. याचा तपास शहर पोलीस करत आहेत.
----
काचा फोडून बाहेर पडल्या
कार कॅनालमध्ये उलटताच त्यात कारचालक बेशुद्ध झाला. यातील जखमी फिर्यादी जिज्ञासा पायाळे जखमी अवस्थेतच गाडीच्या काचा फोडून स्वतः व स्वत: बाहेर आल्या. त्यानंतर, रात्रीत शहर पोलिसांनी येऊन मयतास बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात नेले, तर यातील जखमी मुलीस खासगी रुग्णालयत दाखल केले.