करमाळा बाजार समितीत कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:20 AM2021-04-13T04:20:56+5:302021-04-13T04:20:56+5:30
शासनाच्या आदेशानुसार बाजार समितीतील सर्व व्यवहार सुरू आहेत. शेतमाल, भाजीपाला हे जीवनावश्यक बाबीमध्ये मोडतात. ...
Next
शासनाच्या आदेशानुसार बाजार समितीतील सर्व व्यवहार सुरू आहेत. शेतमाल, भाजीपाला हे जीवनावश्यक बाबीमध्ये मोडतात. त्यामुळे लिलाव, सौदे, वजने पेमेंट्स तसेच मुख्य कार्यालयातील व्यवहार नियमितपणे सुरू आहेत.
सर्व व्यवहार चालू असल्याने बाजार आवारात शेतकरी, हमाल, तोलार, मदतनीस, कर्मचारी, संचालक आदी लोकांची वर्दळ आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीमुळे, संसर्ग होण्याची शक्यता आहे.
यामुळे कोरोना अधिक फैलावू शकतो. हा धोका टाळण्यासाठी बाजार समिती आवारातील वरील सर्व घटकांचे लसीकरण लवकर होणे गरजेचे आहे, असे बंडगर यांनी निवेदनात म्हटले आहे.