आदेशाचा भंग करून धरणे आंदोलन केल्याबद्दल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:18 AM2021-05-29T04:18:09+5:302021-05-29T04:18:09+5:30
टेंभुर्णी : उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील २२ गावांना देण्याबाबत शासनाने घेतलेला निर्णय रद्द करावा यासाठी भीमानगर ...
टेंभुर्णी : उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील २२ गावांना देण्याबाबत शासनाने घेतलेला निर्णय रद्द करावा यासाठी भीमानगर येथे १७ दिवसांपासून धरणे आंदोलन करणारे जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर भैया देशमुख यांच्यासह सहा कार्यकर्त्यांना टेंभुर्णी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी अटक केली. आदेशाचा भंग करून परवानगी नसताना आंदोलन केले म्हणून ही कारवाई करण्यात आली.
जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकरभय्या देशमुख, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांच्यासह दत्तात्रय, विठ्ठल व्यवहारे, विठ्ठल दत्तू मस्के, ज्ञानेश्वर विलास जवळेकर, प्रतापसिंह बिभीषण चंदनकर अशी अटक केलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.
जनहितसह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप आदी कार्यकर्ते १७ दिवसांपासून उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यासाठी देण्याचा शासन निर्णय रद्द करावा म्हणून भीमानगर येथील उजनी धरणाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलनास बसले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले होते. तसेच धरणे आंदोलनास परवानगी देण्यात आली नसतानाही आदेशाचा भंग केल्याबद्दल भादंवि कलम १८८, २६९, २७०, १४३ आदी कलमांन्वये या कार्यकर्त्यांना शुक्रवारी सायंकाळी अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी दिली.
----