रेशनवर धान्य देण्यासाठी मागितली १५०० रुपयांची लाच; डाटा एन्ट्री महिला ऑपरेटवर गुन्हा
By विलास जळकोटकर | Updated: June 18, 2024 19:13 IST2024-06-18T19:13:01+5:302024-06-18T19:13:19+5:30
लाच स्वीकारल्याप्रकरणी बार्शीच्या डाटा एन्ट्री महिले ऑपरेटवर गुन्हा; ॲन्टी करप्शनची कारवाई

रेशनवर धान्य देण्यासाठी मागितली १५०० रुपयांची लाच; डाटा एन्ट्री महिला ऑपरेटवर गुन्हा
सोलापूर : रेशन दुकानावर धान्य मिळण्यासाठी तक्रारदाराकडून लाचेची मागणी करुन १५०० रुपये स्वीकारल्याप्रकरणी अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने बार्शीच्या डाटा एन्ट्री महिला आपरेटरला रंगेहाथ पकडले. मंगळवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. वर्षा भगवान काळे ( डाटा एन्ट्री ऑपरेटर, पुरवठा विभाग, तहसील कार्यालय बार्शी) असे या महिलेचे नाव आहे.
यातील तक्रारदार हे रेशन कार्डवर धान्य मिळत नसल्याने १४ जून २०२४ रोजी अर्ज घेऊन बार्शीच्या तहसीलमधील पुरवठा विभागात काम करणाऱ्या डाटा एन्ट्री ऑपरेटर महिलेकडे गेले होते. त्यांनी अर्ज न स्वीकारता १५०० रुपयांच्या लाचेची मागणी करुन १८ जून २०२४ रोजी बोलावले होते.
दरम्यान तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करुन तक्रार दिली होती. त्यानुसार मंगळवारी सापळा लावण्यात आला. पडताळणीत १५०० रुपयांची लाच स्वीकारताना नमूद आरोपीला रंगहाथ पकडण्यात आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलसी उपअधीक्षक गणेश कुंभार यांनी दिलेल्या प्रेसनोटमध्ये म्हटले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे-खराडे, उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शिरीषकुमार सोनवणे, संतोष नरोटे, रवी हाटखिळे, श्याम सुरवसे यांनी पार पाडली.
-----