दहा लाखासाठी पत्नीला उपाशी ठेवल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा
By रूपेश हेळवे | Published: July 9, 2023 03:07 PM2023-07-09T15:07:37+5:302023-07-09T15:08:16+5:30
फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रूपेश हेळवे, सोलापूर : व्यवसायासाठी माहेरून दहा लाख रूपये घेऊन आणण्यासाठी पत्नीला उपाशी ठेवून तिचा छळ केल्याप्रकरणी सात जणांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मेघा नितेश लोंढे ( वय ३१, रा. गवळी वस्ती, लक्ष्मी पेठ) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी मेघा यांचे नितेश लोंढे यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर सासरच्या मंडळींनी फिर्यादीला त्रास देत तू आमच्या घरात राहण्याची लायकीची नाही, तुला सासरी नांदायचे असेल तर तू आई वडिलाकडून १० लाख रूपये घेऊन ये म्हणत त्रास दिले. शिवाय त्यांना उपाशी ठेवून त्यांना माहेर आणून सोडत, दहा लाख रूपये दिले तरच आम्ही तुमच्या मुलीला नांदवू असे म्हणत नांदवण्यास नकार दिला, अशा आशयाची फिर्याद मेघा लोंढे यांनी दिली आहे. या फिर्यादीवरून पती नितेश लोंढे, सासू सुनंदा लोंढे, दीर दिनेश लोंढे, जाऊ अस्मिता लोंढे ( सर्व रा. चंद्रलोक नगर, जुळे सोलापूर ), प्रकाश सुखदेव कदम, अनुजा ब्रम्हदेव घुले, ब्रम्हदेव घुले ( सर्व रा. सोनी नगर, आमराई) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास दराडे करत आहेत.