मामाला कोयता दाखवून धमकी देणाऱ्या भाच्यावर गुन्हा दाखल
By संताजी शिंदे | Published: June 21, 2024 08:46 PM2024-06-21T20:46:19+5:302024-06-21T20:46:54+5:30
तपास पोलिस नाईक कसबे करीत आहेत.
संताजी शिंदे-सोलापूर: बाळे ब्रिजकडून संतोष नगरकडे जात असताना, चुलत मामाची मोटारसायकल आडवून कोयता दाखवून धमकी दिल्याप्रकरणी भाच्याविरूद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार १९ जून रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडला.
बाबासाहेब अंबादास भोसले (वय ४१ रा. जोशी गल्ली बाळे) हे मोटारसायकल (क्र.एमएच-१३ सीपी-२३८८) वर बाळे ब्रिजकडून संतोष नगरकडे जात होते. दरम्यान समारून त्यांचा चुलत भाचा समोरून आला व त्याने मोटारसायकल आडवली. मागील गुन्ह्यात तुला अडकविलो होतो. परंतू तुझी मस्ती जिरली नाही, आता तुला दाखवतो म्हणत शिवीगाळ करू लागला. त्यावेळी फिर्यादी त्यास काय झाले असे म्हणाला असता, चुलत भाच्याने पॅन्टीच्या मागे ठेवलेला लोखंडी कोयता काढला.
तो दाखवत याने तुझा कार्यक्रमच करतो असे म्हणाला. तेव्हां घाबरलेले बाबासाहेब भोसले हे मोटारसायकल तेथेचे सोडून घरी पळून गेले, त्यानंतर त्यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. या प्रकरणी विकास ऊर्फ पप्पू सुरेश दोरकर (वय २८ रा. गणेश नगर, बाळे) याच्या विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस नाईक कसबे करीत आहेत.