कारहूणवी मिरवणूक काढल्याप्रकरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:17 AM2021-06-25T04:17:08+5:302021-06-25T04:17:08+5:30
अक्कलकोट : अक्कलकोट शहरात कारहुणवीनिमित्त विनापरवाना बँड लावून बैलाचे मिरवणूक काढल्या प्रकरणी एका नगरसेवकासह तिघाविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. २४ ...
अक्कलकोट : अक्कलकोट शहरात कारहुणवीनिमित्त विनापरवाना बँड लावून बैलाचे मिरवणूक काढल्या प्रकरणी एका नगरसेवकासह तिघाविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. २४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता ही घटना घडली आहे.
पोलीस सूत्रानुसार आरोपी
नगरसेवक सद्दाम शेरीकर, नूरुद्दीन गफूर शेरीकर, अख्तर गफूर शेरीकर यांच्यासह अन्य ५० ते ६० जण (सर्व रा. अक्कलकोट) यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे भंग करीत दोन बैलजोडी घेऊन बँड लावून कारंजा चौक येथून मिरवणुकीने निघाले. पोलिसांनी परवानाबाबत विचारले त्यावेळी त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले. यावरून कोरोना कायद्याचे उल्लंघन केले, बेकायदेशीर जमाव जमवून मिरवणूक काढली. अशा विविध कलमान्वये गुन्हा नोंदला आहे. याबाबत पोलीस नाईक धनराज शिंदे फिर्याद दिली आहे.
अधिक तपास पोलीस हवालदार राजाराम फुलारी करीत आहेत.
----