महिलेला जातीवाचक शिवीगाळ, ३ मनपा कर्मचाऱ्यांवर ॲट्रॉसिटी
By रूपेश हेळवे | Updated: July 16, 2023 15:15 IST2023-07-16T15:10:07+5:302023-07-16T15:15:01+5:30
एक दगड पीडितेला लागल्याने पीडितेने हे सांगत असताना आरोपींनी पीडितेला जातीवाचक शिवीगाळ केली.

महिलेला जातीवाचक शिवीगाळ, ३ मनपा कर्मचाऱ्यांवर ॲट्रॉसिटी
सोलापूर : महिलेला दंडाला पकडून ढकलून देत तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तीन मनपा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडितेने सदर बाझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तपन डंके, रामकृष्ण कोमलू, आंबादास शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पीडितेच्या घराच्या परिसरात रस्त्याचे काम सुरू होते. यावेळी एक दगड पीडितेला लागल्याने पीडितेने हे सांगत असताना आरोपींनी पीडितेला जातीवाचक शिवीगाळ केली. शिवाय तिच्या दंडाला धरून ढकलून दिले, अशा आशयाची फिर्याद पीडितेने दिली आहे. ही घटना १३ जुलै रोजी दुपारी घडली. याप्रकरणी मनपा अधिकारी तपन डंके, रामकृष्ण कोमलू, आंबादास शिंदे यांच्यावर विनयभंगाचा व अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कलमा अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पाेलिस करत आहेत.