जातिवाचक गल्ली, गावांची नावे बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:34 AM2020-12-14T04:34:54+5:302020-12-14T04:34:54+5:30

राज्यात सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने सर्व शहरे व ग्रामीण भागातील वस्त्यांची जातिवाचक ...

Caste streets, villages will be renamed | जातिवाचक गल्ली, गावांची नावे बदलणार

जातिवाचक गल्ली, गावांची नावे बदलणार

Next

राज्यात सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने सर्व शहरे व ग्रामीण भागातील वस्त्यांची जातिवाचक नावे बदलून त्या वस्त्यांना विविध महापुरुषाची किंवा तत्सम नावे देण्याचा प्रस्ताव सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला होता. त्यास राज्य मंत्रिमंडळाने एकमुखी मान्यता दिली आहे.

शासन निर्णयानुसार सांगोला शहरातील कुंभार गल्ली, रामोशी गल्ली, परीट गल्ली, लोहार गल्ली, धनगर गल्ली, सनगर गल्ली, ढोर गल्ली, कोष्टी गल्ली, तेली गल्ली, बुरूड गल्ली, गोंधळी गल्ली यासह ग्रामीण भागातील धायटी (पारधी वस्ती) कुंभार वाडा, महारवाडा, ब्राह्मणवाडा, वाण्याची गल्ली, चांभारवाडा, मांगवाडा, न्हावी गल्ली या गल्ल्या व गावांची नावे बदलून महापुरुषांची किंवा तत्सम नावे दिली जाणार आहेत.

कोट :::::::::::::::::::::::

सांगोला शहरातील बारा बलुतेदार असणारी जातिवाचक नावे बदलण्याविषयी नगरपालिकेला सध्यातरी कोणतेही आदेश प्राप्त झाले नाहीत; मात्र सरकारने चांगला निर्णय घेतला आहे. जातिवाचक नावे बदलल्यामुळे कालांतराने समाजात जातीय सलोखा व शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल.

- कैलास केंद्रे

मुख्याधिकारी

कोट :::::::::::::::::::::::::

मुळात आपल्या राज्यघटनेमध्ये सर्व धर्म, जातीविषयी कोणतेही भेदभाव करू नये किंवा बोलू नये असा उल्लेख आहे. त्यामुळे शासनाचा हा निर्णय आहे तो फार पूर्वी होणे गरजेचे होते.

रोहित सोनवणे

ॲडव्होकेट, सांगोला

Web Title: Caste streets, villages will be renamed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.