मार्डीत आढळले अत्यावस्थेतील उदमांजर
By शीतलकुमार कांबळे | Updated: June 27, 2024 13:23 IST2024-06-27T13:22:14+5:302024-06-27T13:23:13+5:30
उपचारासाठी वनविभागाच्या रुग्णालयात : जीव वाचविण्यासाठी वन्यजीवप्रेमींचे प्रयत्न.

मार्डीत आढळले अत्यावस्थेतील उदमांजर
शीतलकुमार कांबळे, सोलापूर : मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथील शेतात उदमांजर अत्यावस्थ अवस्थेत आढळले. वन्यजीवप्रेमींनी त्याला सुरक्षितरित्या पकडले. वन विभागाच्या रुग्णालयात उपचारासाठी पोहोचवले.
मार्डी येथील प्रितेश तट्टे यांच्या शेतात एक उदमांजर अत्यवस्थ स्थितीत असल्याचे रोहन सरडे यांनी संतोष धाकपाडे माहिती दिली. माहिती मिळताच वाईल्डलाईफ कॉझर्वेशन असोसिएशन सोलापूरचे सुरेश क्षीरसागर, संतोष धाकपाडे, रोहित गावडे, लखन भोगे हे चौघे मार्डी येथे गेले. क्षीरसागर यांनी त्या उदमांजरला अलगद एका विशिष्ट केज (पिंजऱ्यात) मध्ये बंद केले.
उदमांजर जास्तच अत्यवस्थ असल्याने माळढोक अभयारण्य क्षेत्रातील वनपाल दाभाडे सरांच्या मार्गदर्शनाने सोलापूर वनविभाग येथील उपचार केंद्रात दाखल करण्यात आले. ते उदमांजर आता डॉक्टरांच्या देखरेखित आहे. बचाव कार्यात लखन भोगे, वनपाल शंकर कुताटे, गणेश निरवणे, प्रवीण जेऊर आदीने यांनी सहकार्य केले.