दुचाकी चोरट्यास पकडले; पाच दुचाकी, दोन रिक्षा सांगोला पोलिसांनी केल्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 03:37 PM2021-10-19T15:37:00+5:302021-10-19T15:38:54+5:30
सांगोला पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने दुचाकी चोरास पकडून मुसक्या आवळल्या
सांगोला : सांगोला पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने दुचाकी चोरास पकडून मुसक्या आवळल्या. या दुचाकी चोराकडून अनेक दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
दरम्यान, सांगोला शहर व तालुक्यातून वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांची दखल घेवून पोलीस दुचाकी चोरांचा शोध घेत असताना बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे व अद्यावत तपास यंत्रणेच्या मदतीने दुचाकी चोरास रिक्षासह रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून पाच दुचाकी, दोन रिक्षा असा सुमारे २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर चोरीला गेलेल्या दुचाकी व रिक्षा मालकांनी सांगोला पोलीस स्टेशनशी आवश्यक कागदपत्रासह संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी केले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते ,अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश यमगर, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता वजाळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल आप्पासाहेब पवार, पोलीस नाईक राहुल कोरे, पोलीस नाईक अभिजीत मोहोळकर, पोलीस नाईक सुखदेव गंगणे , पोलीस नाईक बाबासाहेब पाटील, पोलीस नाईक सचिन हेंबाडे, पोलीस काॅन्सटेबल धुळा चोरमले, सायबर सेलचे पोलीस काॅन्सटेबल अन्वर अत्तार यांनी केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक राहुल देवकाते करीत आहेत.