अवैध तांदूळ वाहतूक करणारा ट्रक पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:15 AM2021-07-19T04:15:56+5:302021-07-19T04:15:56+5:30

कामती : कामती पोलिसांनी मंद्रूपहून कोरवली (ता. मोहळ)मार्गे निघालेला तांदळाचा ट्रक पकडून ११ लाख १७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल ...

Caught a truck transporting illegal rice | अवैध तांदूळ वाहतूक करणारा ट्रक पकडला

अवैध तांदूळ वाहतूक करणारा ट्रक पकडला

Next

कामती : कामती पोलिसांनी मंद्रूपहून कोरवली (ता. मोहळ)मार्गे निघालेला तांदळाचा ट्रक पकडून ११ लाख १७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार १७ जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास कामती पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार के.एस. नाईकवाडी यांना अवैध तांदळाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. मंद्रूप-कामती रस्त्यावर संशयित ट्रक (एमएच-१३ एएक्स-२२४४) कोरवली येथील जिल्हा परिषद शाळेजवळ थांबवला. चालकाकडे तांदळाची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. या तांदळाची तपासणी केली असता पाठीमागे डबल घोडा चिन्ह निदर्शनास आले. त्या बाजूला ठेवलेल्या रंगीबेरंगी गोण्यांमध्ये तांदूळ भरून निघालेला साठा मिळाला. निर्दशानास आल्याने

वाहतूक करणारा सागर तानाजी लवटे (रा. तिहे, ता. उ. सोलापूर) व त्याचा साथीदार रखी म्हमाणे (रा. शिगोली, ता. मोहोळ), सचिन सावकार (रा. विजापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे, ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. हवालदार कोटम, मुंढे, कासले, नायकोडे यांनी या कामगिरीत सहभाग नोंदवला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने करत आहेत.

----

तांदळाचे घेतले नमुने

तांदळाचा ट्रक पोलीस ठाण्यात आणून लावला, तसेच तपासणीबाबत तहसील कार्यालयाला पत्र देण्यात आले. तहसीलदारांनी सदर ट्रकची तपासणी करून वेगवेगळ्या गोण्यांतून तांदळाचे नमुने घेतले.

----

फोटो : १८ कामती ट्रक

तांदळाचा ट्रक

Web Title: Caught a truck transporting illegal rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.