सुरक्षिततेसाठी सोलापूर शहरातील प्रत्येक कॉलनीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, शहर पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांचे आवाहन, पोलीस खात्याकडून राबवणार विशेष मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:22 PM2018-02-15T12:22:37+5:302018-02-15T12:23:44+5:30
शहर आणि परिसरात चोºया, दरोडे, चेन स्नॅचिंगसारख्या प्रकाराने डोके वर काढले आहे. यावर मात करण्याच्या दृष्टीने प्रभावी उपाय म्हणून प्रत्येक कॉलनीमध्ये नागरिकांनी पुढाकार घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत. यासाठी जनजागरण म्हणून पोलीस आयुक्तालयामार्फत बनवलेली शॉर्ट फिल्म कॉलनीमध्ये दाखवून नागरिकांमधून प्रबोधन करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी दिली.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १५ : शहर आणि परिसरात चोºया, दरोडे, चेन स्नॅचिंगसारख्या प्रकाराने डोके वर काढले आहे. यावर मात करण्याच्या दृष्टीने प्रभावी उपाय म्हणून प्रत्येक कॉलनीमध्ये नागरिकांनी पुढाकार घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत. यासाठी जनजागरण म्हणून पोलीस आयुक्तालयामार्फत बनवलेली शॉर्ट फिल्म कॉलनीमध्ये दाखवून नागरिकांमधून प्रबोधन करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी दिली.
सोलापूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भुरट्या चोरट्यांनी उच्छांद मांडला आहे. बंद घर पाहून घर फोडण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून पोलीस खात्याने पेट्रोलिंग वाढवण्यावरही भर दिला आहे. यावरही मात करीत चोरट्यांचे चोºयांचे सत्र सुरूच आहे. पोलीस आपली जबाबदारी पार पाडत असताना यामध्ये नागरिकांचाही सहयोग महत्त्वाचा आहे. आपल्या परिसरात एखादी अनुचित घटना घडत असल्यास वा तसा संशय आल्यास तातडीने नजीकच्या पोलीस ठाण्याला कल्पना द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले.
शहरातील काही कॉलनीमधील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सीसीटीव्ही टीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहे, ही दिलासा देणारी बाब आहे. पोलीस आयुक्तालयामार्फत अधिक प्रबोधन व्हावे, यासाठी पाच मिनिटांची शॉर्ट फिल्म बनवली आहे. यामध्ये सात ते आठ गुन्हे उघडकीस आलेल्या सत्य घटनांचा समावेश करण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेरा असल्यामुळे हे गुन्हे उघडकीस आले आहेत. शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुख्य शहराशिवाय हद्दवाढ भागही विस्तारला आहे. अशावेळी केवळ पोलीस यंत्रणा चोºयांशिवाय अनुचित घटना टाळू शकत नाही. सुजाण नागरिकांनी यासाठी हातभार लावून आपल्या सुरक्षेसाठी सीसी टीव्ही बसवण्यासाठी पाऊल उचलावे, असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.
---------------------
स्वत:च्या सुरक्षेसाठी पुढे या!
- पोलीस खाते नेहमीच तुमच्या पाठीशी आहे, मात्र शहवासीयांनी आपल्या सुरक्षेसाठी आमच्या आवाहनास प्रतिसाद द्यावा. कॉलनीतील नागरिकांनी लोकवर्गणीतून सीसीटीव्ही बसवण्याचा उपक्रम हाती घ्यावा. अन्यत्र हवा तेवढा पैसा खर्च होत असताना लाखमोलाच्या आयुष्यासाठीही सामाजिक भान म्हणून सतर्क व्हावे, असे आवाहन पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी केले आहे.