वाळूजमध्ये ग्राहक दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:12 AM2020-12-28T04:12:33+5:302020-12-28T04:12:33+5:30

--- फोटो : २७ वाळूज वाळूज येथे ग्राहक दिनानिमित्त महिलांना साडी वाटप करण्यात आले. देगाव-कौठाळी रस्ता खराब वाळूज : ...

Celebrate Consumer Day in the sand | वाळूजमध्ये ग्राहक दिन साजरा

वाळूजमध्ये ग्राहक दिन साजरा

googlenewsNext

---

फोटो : २७ वाळूज

वाळूज येथे ग्राहक दिनानिमित्त महिलांना साडी वाटप करण्यात आले.

देगाव-कौठाळी रस्ता खराब

वाळूज : मोहोळ तालुक्यात देगाव-कौठाळी हा रस्ता निजामकालीन होता. हा रस्ता सध्या वाहिवाटीत नसून शेतकऱ्यांनी शेती थाटली आहे, तर काही ठिकाणी फक्त शिव रस्ता म्हणूनच राहिला आहे. पूर्वी तुळजापूर तालुका असताना या रस्त्याला जास्त महत्त्व होते. या रस्त्यावरील खड्डे आणि अतिक्रमण काढून रस्ता पूर्ववत करावा. या मार्गावरून तुळजापूरला जाण्यासाठी अगदी जवळ आहे. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी धावपळ

चपळगाव : अक्कलकोट तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदत असल्याने अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. काहींनी अजूनही आवश्यक कागदपत्रांची जमवा जमव सुरू केली आहे. जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला ते अशा अनेक प्रकारचे दाखले काढायला सुरुवात केली आहे.

--

सर्व्हरचा डाउनची डोकेदुखी वाढली

चपळगाव : ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी ऑनलाइन फाॅर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र सर्व्हरमध्ये वारंवार व्यत्यय येत असल्याने फाॅर्म भरण्यासाठी आलेल्या उमेदवारांची डोकेदुखी वाढत आहे. अर्ज भरण्याला मुदत दिली असून, इच्छुकांची गर्दी होत आहे.

---

ऊसतोडीचा प्रश्न ऐरणीवर

चपळगाव : अक्कलकोट तालुक्याच्या उत्तर भागात उसाचे क्षेत्र मोठे आहे. ऑक्टोबरमधील अतिवृष्टीनंतर यावर्षी पाणी मुबलक आहे. उसाच्या क्षेत्रात भर पडली आहे. सगळीकडेच कारखाने सुरू असले तरी ऊसतोड कामगारांच्या कमतरतेमुळे ऊसतोडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Web Title: Celebrate Consumer Day in the sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.