शिपलगिरीर महाराजांची पुण्यतिथी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:24 AM2021-05-27T04:24:20+5:302021-05-27T04:24:20+5:30

आशा वर्कर्सच्या संपाला माळशिरसमधून प्रतिसाद वेळापूर : आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाला माळशिरस तालुक्यातून प्रतिसाद मिळाला. या ...

Celebration of the death anniversary of Shipalgirir Maharaj | शिपलगिरीर महाराजांची पुण्यतिथी साजरी

शिपलगिरीर महाराजांची पुण्यतिथी साजरी

Next

आशा वर्कर्सच्या संपाला माळशिरसमधून प्रतिसाद

वेळापूर : आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाला माळशिरस तालुक्यातून प्रतिसाद मिळाला. या संपात ३९८ आशा स्वयंसेविका तर २० गटप्रवर्तक संपावर गेले आहेत. लाल बावटा आशा गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका फेडरेशनच्या जिल्हा अध्यक्षा पुष्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा संप पार पडला. कोरोना लसीकरणासाठी काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना प्रतिदिन ५०० रुपये भत्ता द्यावे, नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटातील प्रवर्तकांना पाच हजार रुपये भत्ता द्यावा, अशी मागणी करण्यात आली. या मागण्या अनिता साखरे, सुरेखा नारनवर यांनी ही मागणी केली.

स्वेरीत पालकांचा ऑनलाईन मेळावा

पंढरपूर : तालुक्यात गोपाळपूर येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्यावतीने मेकॅनिकल विभागाच्या द्वितीय ते अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी ऑनलाईन पालक मेळावा घेण्यात आला. संस्थापक सचिव प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, प्रा. गुरूराज इनामदार, विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या पालक मेळाव्यात मुख्तार अत्तार, कल्याण पाटील, अंबादास भंडारे, नागणमी पडगे, शैला निकते, जागृती देशपांडे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

नाभिक बांधवांना धान्य वाटप

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाभिक बांधवांचा व्यवसाय बंद असल्याने समाजबांधवांचे जगणे कठीण झाले आहे. समाजातील १६५ गरजू बांधवांना काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते अन्नधान्याचे कीट वाटप करण्यात आले. उत्तर कसबा येथील संत सेना महाराज मंदिरात नाभिक महामंडळ मुंबई शाखेच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी युवा नेते प्रवीण वाले, ओबीसी ब्रिगेडचे संस्थापक किशोर शेठे, सरचिटणीस मल्लिनाथ चौधरी, नरवीर शिवा काशीद संस्थेचे अध्यक्ष भारत शिंदे, मनोग डिगे, गणेश वाघमारे, स्वप्निल रणदिवे उपस्थित होते.

आगळगावात घेतला कोरोनाचा आढावा

वैराग : बार्शी तालुक्यात आगळगाव येथे विठ्ठल मंदिरात नायब तहसीलदार संजीवन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी नव्याने स्थापन झालेल्या कोरोना सेंटरचा आढावा घेण्यात आला. यावेळी गावातील कुपोषित बालकांची सद्य:स्थिती जाणून घेण्यात आली. त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्यांची मते जाणून घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बालाजी जाधव, सरपंच पुतळाबाई गरड, उपसरपंच वैभव उकिरडे, ग्रामसेवक तात्यासाहेब साठे, शरद उकिरडे, सर्कल भगवान मुंडे, हरिदास ताले उपस्थित होते.

भोसे येथील जानुबाई देवीची यात्रा रद्द

पंढरपूर : तालुक्यातील भोसे येथील जानुबाई देवीची यात्रा यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे. याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात बैठक पार पडली. सरपंच गणेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, यशवंतभाऊ पाटील, जयवंत गावंधरे, तानाजी गावंधरे, धनाजी तळेकर उपस्थित होते. गुरुवार, शुक्रवार, शनिवार अशी तीन दिवस यात्रा भरते. या यात्रेतील अनेक गावांतून नागरिक येत असतात.

कन्हेरच्या शिबिरात १०६ जणांचे रक्तदान

माळशिरस : तालुक्यात कन्हेर येथे रमेश पाटील कुटुंबीयांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिरात १०६ जणांनी रक्तदान केले. माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड, दादासाहेब दुलंगे, पंचायत समिती सदस्य गौतम माने, बाळासाहेब सरगर, भानुदास सालगुडे, पी. व्ही. कुलकर्णी, बाबासाहेब माने, अक्षय गुंड, कुमार पाटील, दादा पाटील, राजेंद्र पवार, डॉ. दत्तात्रय सर्जे, डॉ. सिद, डॉ. केमकर, डॉ. अनिल पाटील उपस्थित होते.

Web Title: Celebration of the death anniversary of Shipalgirir Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.