बसव जयंतीचा उत्सव सरावाने बहरणार; सोलापुरी लेझीमचा सळ्ळ..सळ्ळ होणार

By काशिनाथ वाघमारे | Published: April 12, 2023 04:00 PM2023-04-12T16:00:20+5:302023-04-12T16:01:20+5:30

उत्सवप्रिय सोलापुरात सणासुदीत तरुणाईकडून कला सादरीकरण होत राहते.

celebration of basava jayanti will bloom in solapur | बसव जयंतीचा उत्सव सरावाने बहरणार; सोलापुरी लेझीमचा सळ्ळ..सळ्ळ होणार

बसव जयंतीचा उत्सव सरावाने बहरणार; सोलापुरी लेझीमचा सळ्ळ..सळ्ळ होणार

googlenewsNext

काशिनाथ वाघमारे, सोलापूर :  उत्सवप्रिय सोलापुरात सणासुदीत तरुणाईकडून कला सादरीकरण होत राहते. अशाचप्रकारे लेझीमचं सादरीकरण यंदा बसव जयंतीनिमित्त होणार आहे. शेळगी परिसरात विद्या नगरमधील १५० तरुण गेली महिनाभर रात्री दोन तास सराव करताहेत.  या कला सादरीकरणातून विविध डाव पहायला मिळणार आहेत. 

यंदाही शेळगी परिसरात बसव जयंतीनिमित्त शिवबसव सामाजिक संस्था अनोख्या प्रकारे साजरी करत आहे. संस्थापक अध्यक्ष शंकर बंडगर हे मागील १५ वर्षांपासून बसवेश्वरांच्या चरित्र प्रसंगावर आधारीत नाटकं आणि देखावे सादर करुन उत्सवातले वेगळेपण जपले आहे. यंदा हलगीच्या तालावर लेझीम मधील विविध डाव, सोलापुरी कला सादर करणार आहेत.  यासाठी रात्री ८ ते १० ही दोन तास राहूल बजाज या कलाप्रेमीच्या नेतृत्वाखाली विविध खेळप्रकाराची तयारी करताहेत. 

२२ एप्रिल रोजी सायंकाळी विद्यानगरमधे या लेझीम खेळप्रकारचे सादरीकरण तरुणाई करणार आहे. त्यानंतर हे तरुण शिवाजी चौक येथून बाळीवेस, टिळक चौक मार्गे कौंतम चौकात बसवेश्वरांच्या पुतळा परिसरात शेवटचे सादरीकरण होणार आहे.

फिरकी डाव, नागीन प्रकार...

मराठमोळ्या लेझीम मध्ये फिरकी डाव, नागीन प्रकार सादरीकरण होणार आहे. हलगी अन शिट्टीच्या तालावर हे कलाप्रकार सादरीकरण होणार आहेत. यासाठी दिवसभर काम करुन रात्री पुरेशी झोप घेतात आणि सायंकाळी ठरलेल्या दोन तासात उत्कृष्ठ सादरीकरणावर भर देताहेत.  थोरला मंगळवेढा येथील लेझीम कलाकारांच्या कला सादरीकरणाचे निरीक्षण करुन स्वत: वेगळ्या स्टेप्स रचताहेत

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: celebration of basava jayanti will bloom in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.