आस्मानी संकटाने बळीराजाच्या डोळ्याच्या कडा पुन्हा पानावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:02 AM2021-02-20T05:02:51+5:302021-02-20T05:02:51+5:30

कारी : अतिवृष्टीनंतर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने बळीराजाची पुन्हा एकदा झोप उडकली आहे. कारी परिसरात ज्वारी, गहू, हरभरा ...

The celestial crisis closed the corners of Baliraja's eyes again | आस्मानी संकटाने बळीराजाच्या डोळ्याच्या कडा पुन्हा पानावल्या

आस्मानी संकटाने बळीराजाच्या डोळ्याच्या कडा पुन्हा पानावल्या

Next

कारी : अतिवृष्टीनंतर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने बळीराजाची पुन्हा एकदा झोप उडकली आहे. कारी परिसरात ज्वारी, गहू, हरभरा या मुख्य पिकावर आस्मानी

संकट ओढावले आहे. बार्शी पूर्व भागातील मंडळ

कृषी पांगरी अंतर्गत नारी, खामगाव, गोरमळे, पांगरी, पांढरी, ममदापूर आदी

भागाला शुक्रवारी रात्री अचानक झोडपून काढले. त्यामुळे मुळे बळीराजाच्या डोळ्याच्या कडा पुन्हा पणावल्या आहेत.

रात्री

अचानक सुरू झालेल्या सुसाट वा-याने निद्रेत असलेल्या शेतकरी घाबरून गेला. मळणी केलेल्या अनेकांच्या खळ्यात पाणी शिरले. कारीत सागर विधाते या शेतक-याचा २० कट्टे गहू भिजला. ब-याच शेतक-याचा हरभरा पिकाचे कडपे

भिजवून गेले. काढणीसाठी आलेली ज्वारी, गहू, हरभरा व कांदा

पिकांसह द्राक्ष पिकांला मोठा फटका बसल.मोठ्या अथक परिश्रम करून उभ्या केलेल्या द्राक्षे पिकाचे नुकसान नुकसान जसेजसे ऊन वाढत जाईल तसे मण्याला चिरा जाऊन प्रचंड नुकसान होते असे

द्राक्ष बागायतदार श्री महेश डोके यांनी सांगितले. सुसाट वा-यामुळे द्राक्ष बागेत घड पडले. अतिवृष्टीनंतर पुन्हा आस्मानी संकटाने रब्बी

हंगामात बहुतांश पिकांचे नुकसान झाले.नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी वर्गातून

केली जात आहे .

-----

फोटो : १९ कारी १

१९ कारी २

तीन दिवसातील अवकाळी पावसामुळे कारी मंडलात द्राक्ष आणि ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: The celestial crisis closed the corners of Baliraja's eyes again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.