केंद्र शासनाने ३८ वर्षांनंतर बदलले शैक्षणिक धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:12 AM2020-12-28T04:12:31+5:302020-12-28T04:12:31+5:30

मातोश्री दिवंगत गिरिजाबाई ढोबळे यांच्या स्मृतिदिना निमित्त मोहोळ येथे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ झाली पाहिजे, या हेतूने राज्यातील २६ संस्थेच्या ...

Central government changes education policy after 38 years | केंद्र शासनाने ३८ वर्षांनंतर बदलले शैक्षणिक धोरण

केंद्र शासनाने ३८ वर्षांनंतर बदलले शैक्षणिक धोरण

Next

मातोश्री दिवंगत गिरिजाबाई ढोबळे यांच्या स्मृतिदिना निमित्त मोहोळ येथे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ झाली पाहिजे, या हेतूने राज्यातील २६ संस्थेच्या प्राचार्य व प्राध्यापकांसाठी शाहू शिक्षण संस्थेतर्फे मार्गदर्शन चर्चासत्रात ते बोलत होते.

यावेळी निवृत्त फौजदार विठ्ठल माने यांनी संस्कार, सिनेअभिनेते मंदार देशपांडे यांनी शिक्षणाची बदललेली भूमिका आणि कौशल्य विकास, पुणे येथील अजय साळुंखे व त्यांचे सहकारी विनय पाटील, रोहित जाधव यांनी सोशल मीडिया वापराविषयी मार्गदर्शन केले. तसेच वसुंधरा रोमन फाउंडेशनच्या अध्यक्ष ॲड. कोमल साळुंखे आणि क्रांती आवळे यांनी शिक्षक व करिअर स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचे करिअर या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी अनुराधा ढोबळे, सिद्राम जावीर, अब्राहम आवळे, क्रांती आवळे, कोमल ढोबळे, अजय साळुंखे, अभिजित ढोबळे, शॅरोन ढोबळे, शाहू परिवारातील मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी शफीक तलफदार, सुधीर नाईकनवरे, प्राचार्य राहुल पाटील, संजय भोसले, धनाजी माने, संजय वाघमोडे, किरण इंगोले, प्रशांत कदम, महादेवी राजमाने, दिनकर मोरे, नागेश गायकवाड यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. प्रमोद कोरे यांनी केले व आभार कोमल ढोबळे साळुंखे यांनी मानले.

Web Title: Central government changes education policy after 38 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.