गॅस सिलिंडला हार घालून केंद्र सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:15 AM2021-07-03T04:15:29+5:302021-07-03T04:15:29+5:30
या आंदोलनात गॅस सिलिंडरला हार घालून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी निषेध करण्यात आला. दरवाढ मागे घेण्यात यावी यासाठी प्रशासनास ...
या आंदोलनात गॅस सिलिंडरला हार घालून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी निषेध करण्यात आला. दरवाढ मागे घेण्यात यावी यासाठी प्रशासनास निवेदन दिले.
या वेळी करमाळा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, शहराध्यक्ष ॲड. शिवराज जगताप, राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीनभाऊ झिंजाडे, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष शरद नेटके, युवक राष्ट्रवादीचे महेश काळे-पाटील, तेजस ढेरे, राष्ट्रवादी किसान सभेचे तालुका कार्याध्यक्ष सचिन नलवडे, महिला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नलिनी जाधव, शहराध्यक्ष राजश्री कांबळे, नंदिनी लुंगारे, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे, शहाजी झिंजाडे यासह अनेक पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
----
दरवाढ झाल्यामुळे गोरगरीब लोकांचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने केलेली दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी.
- संतोष वारे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, करमाळा
----
इंधन दरवाढ, बँकांनी वाढवलेले चार्जेस यामुळे सामान्य लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने इंधन दरवाढ, बँक चार्जेसची दरवाढ त्वरित मागे घ्यावी.
- नितीनभाऊ झिंजाडे, प्रदेश सदस्य, राष्ट्रवादी पदवीधर संघ
फोटो ओळी : दरवाढीच्या निषेधार्थ गॅस टाकीला हार घालून निवेदन देताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी.