सीईओ मनिषा आव्हाळे यांनी अचानक दिली वसतीगृहाला भेट; अस्वच्छतेबाबत नाराजी

By शीतलकुमार कांबळे | Published: July 27, 2023 01:19 PM2023-07-27T13:19:35+5:302023-07-27T13:20:00+5:30

विद्यार्थ्यांना सुविधा देण्याच्या सूचना

CEO Manisha Awhale paid a surprise visit to the hostel; Displeasure with cleanliness | सीईओ मनिषा आव्हाळे यांनी अचानक दिली वसतीगृहाला भेट; अस्वच्छतेबाबत नाराजी

सीईओ मनिषा आव्हाळे यांनी अचानक दिली वसतीगृहाला भेट; अस्वच्छतेबाबत नाराजी

googlenewsNext

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या सीईओ मनिषा आव्हाळे यांनी नेहरु हॉस्टेलला भेट दिली. हॉस्टेलची पाहणी करुन त्यांनी स्वच्छता व दुरुस्तीबाबतच्या सूचना दिल्या. यावेळी शिक्षणाधिकारी संजय जावीर हे उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारे नेहरु वसतीगृहाची पाहणी सीईओ मनिषा आव्हाळे यांनी केली. शिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्यासोबत त्यांनी वसतीगृहाची सद्यस्थिती जाणून घेतली. वसतीगृहात असलेल्या अस्वच्छतेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच काही ठिकाणी दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या.

मे महिन्यात वसतीगृहात पाणी मिळत नसल्याबद्दल विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. तत्कालिन सीईओ दिलीप स्वामी यांनी याची दखल घेतली होती. यंदाच्या वर्षी परीक्षा उशीरापर्यंत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना वसतीगृह सोडता आले नाही. प्रशासनानेही विद्यार्थ्यांना राहण्याची परवानगी दिली होती. मात्र, यामुळे वसतीगृहाची स्वच्छता व दुरुस्ती करता आली नव्हती. आता स्वच्छतेचे नव्यावे टेंडर देण्यात येणार असून गरजेच्या ठिकणी दुरुस्ती करण्यात येणार आहे.

Web Title: CEO Manisha Awhale paid a surprise visit to the hostel; Displeasure with cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.