हजारोंच्या साक्षीने दुधनीत श्री सिद्धरामेश्वरांचा अक्षता सोहळ्याची सुरूवात
By Appasaheb.patil | Published: January 14, 2023 04:35 PM2023-01-14T16:35:29+5:302023-01-14T16:38:19+5:30
दुधनीचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धारामेश्वर अक्षता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.
दुधनी : दुधनीचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धारामेश्वर अक्षता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. यावेळी यात्रेचे मानकरी इरय्या पुराणिक, चनविर पुराणिक, सुगेश बाहेरमठ, महेश बाहेरमठ, शांतलिंग बाहेरमठ हे वेदोक्त पद्धतीने मंत्रोच्चार करत आहेत. दुधनी विरक्त मठाचे मठाधिपती डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली देवस्थान पंच कमिटीचे चेअरमन चंद्रकांत येगदी, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिद्धाराम येगदी, प्रभुलिंग पाटील, गिरमल्लप्पा सावळगी, सिद्धाराम मल्लाड यांच्या हस्ते सुगडी पूजन करण्यात आले.
यावेळी लक्ष्मीपुत्र पाटील, मल्लिनाथ म्हेत्रे, सातलिंग परमशेट्टी, मलकाजप्पा अल्लापुर, शिवशरणप्पा हबशी, चंद्रकांत बबलाद, शिवानंद हौदे, बसण्णा धल्लू, शरणप्पा मगी, बसवराज शांतप्पा हौदे, गुरूशांत ढंगे, बाबा टक्कळकी, लक्षमीपुत्र हबशी, मल्लिनाथ येगदी, नंदू संगोळगी, शिवानंद फुलारी, संतोष जोगदे, बसवराज हौदे, महेश गुळगोंडा, श्रीशैल माशाळ, दौलत हौदे, लक्षमीपुत्र भाईकट्टी, उमेश सावळसूर, अभिषेक पादी यांच्यासह दुधनी आणि पंचक्रोशीतील भक्तांनी मोठी गर्दी केली आहे.
पोलिस निरीक्षक महेश रामेश्वर, पोलीस उप निरीक्षक रेवणसिद्ध काळे, पो हवालदार अजय भोसले, पोलीस नाईक नाबिलाल मियावाले, सुरेश लामजने, पो कॉन्स्टेबल सचिन गायकवाड, राजू खंडाळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. अक्षता सोहळ्यासाठी दुधनी शहरासह ग्रामीण भागातील तरुणांसह, महिला मोठ्या संख्येत हजर होत्या.