ओबीसी आरक्षण बचावसाठी सावळेश्वरात साखळी उपोषण
By दिपक दुपारगुडे | Published: June 22, 2024 06:58 PM2024-06-22T18:58:18+5:302024-06-22T18:58:43+5:30
लांबोटी , पोफळी , रामहिंगणी, मलिकपेठ, या भागातून ओबीसी समाजबांधवांनी या उपोषणाला पाठिंबा दिला.
सोलापूर : सावळेश्वर येथील समस्त धनगर समाज व ओबीसीतील ३७६ जातीच्या आरक्षण लढ्यासाठी एक दिवसाचे साखळी उपोषण करण्यात आले. या साखळी उपोषणाच्या माध्यमातून वडीगोद्री (ता. अंबड) येथे उपोषण करणारे प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे व मंगेश ससाणे यांना पाठिंबा देण्यात आला. यावेळी सावळेश्वरचे सरपंच पार्वती गावडे यांनी पाठिंब्याचे पत्र दिले.
लांबोटी , पोफळी , रामहिंगणी, मलिकपेठ, या भागातून ओबीसी समाजबांधवांनी या उपोषणाला पाठिंबा दिला. यावेळी मोहोळ कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनाजी गावडे, माजी पंचायत समिती सदस्य कालिदास गावडे, बाळासाहेब गावडे, शिवाजी काकडे, सीताराम गुंड, नितीन सोनटक्के, नानासाहेब गावडे, दीपक गावडे, शशिकांत गावडे, दादाराव लांडगे आनंद गावडे, प्रदीप उराडे, नवनाथ आवारे, धनाजी उराडे, सोमनाथ गावडे, भानुदास गावडे, बिरूदेव शेंडगे, प्रभाकर गुंड, सचिन शेंडगे, संतोष गावडे, हनुमंत उराडे , बबन मिसाळ, दत्ता गावडे, राजू टेकाळे, हरिदास गावडे, लक्ष्मण वाघमोडे, नागनाथ गावडे, राजेंद्र लांडगे, जांबुवंत उराडे, समाधान पुजारी, अमित कवितके, बाबासाहेब साबळे आदी उपस्थित होते.