वीज कामगारांचे सोलापुरात साखळी उपोषण; जाणून घ्या नेमकं कारण?

By Appasaheb.patil | Published: January 25, 2024 04:02 PM2024-01-25T16:02:50+5:302024-01-25T16:03:28+5:30

महावितरण सोलापूर मंडळ कार्यालय समोर, जुनी मिल कंपाऊंड, मुरारजी पेठ, सोलापूर येथे बेमुदत साखळी उपोषण चालू करण्यात आले आहे.

chain hunger strike of electricity workers in solapur | वीज कामगारांचे सोलापुरात साखळी उपोषण; जाणून घ्या नेमकं कारण?

वीज कामगारांचे सोलापुरात साखळी उपोषण; जाणून घ्या नेमकं कारण?

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कर्मचारी सेवा जेष्ठता विनियम २००५ नुसार यंत्रचालकांची ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करून पदोन्नती आदेश निर्गमित करावे. या मागणीसाठी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन (१०२९) च्या वतीने गुरुवार २५ जानेवारी २०२४ पासून महावितरण सोलापूर मंडळ कार्यालय समोर, जुनी मिल कंपाऊंड, मुरारजी पेठ, सोलापूर येथे बेमुदत साखळी उपोषण चालू करण्यात आले आहे.

दरम्यान, मागील कित्येक वर्षापासून महावितरण कर्मचारी विविध अडचणींचा सामना करीत आहेत. शिवाय विविध मागण्यां शासनस्तरावर प्रलंबित आहेत. या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमत शी बोलताना सांगितले. यावेळी बारामती परिमंडळ अध्यक्ष तानाजी चटके, ओंकारनाथ गाये, बाबासाहेब कारंडे, सोलापूर मंडळ अध्यक्ष सुनिल काळे, हणमंत जाधव, उत्तरेश्वर स्वामी, शुकुर शेख, शिवलिंगप्पा हारगेरी, प्रतिभा येळगे, धनंजय लिंगायत, अजीम चौधरी, मयुर गवते, शिवाजी घाडगे, अगतराव कोरके, राहुल धड्डे, अक्षय कोमकार, गौरीशंकर गुरव, मोहन अनंतकवळस, उमेश राऊत, सिद्धेश्वर क्षीरसागर, रणजीत चव्हाण, श्रीनिवास पवार, सागर बंडगर, राहुल भोसले, अखिल आत्तार, सोमनाथ कोनाळे, प्रशांत कुंभार, नरेंद्र सुवर्णकार व ईतर सभासद उपस्थित होते.

Web Title: chain hunger strike of electricity workers in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.