आज चैत्री एकादशी; विठ्ठल मंदिरात फुलांची सजावट, पाच लाखांहून अधिक भाविक दाखल
By Appasaheb.patil | Published: April 2, 2023 12:53 PM2023-04-02T12:53:16+5:302023-04-02T12:53:48+5:30
आज कामदा एकादशी म्हणजे धावती यात्रा असेही संबांधले जाते.
सोलापूर : श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने आज कामदा एकादशी (चैत्र यात्रा) निमित्त श्री. विठ्ठल व श्री. रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात सुंदर व मनमोहक अशी फुलाची आरास करण्यात आली आहे. चैत्र एकादशीनिमित्त पंढरीत चार ते पाच लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत.
दरम्यान, शनिवारपासूनच पंढरीत भाविकांची संख्या हळूहळू वाढू लागली होती. चंद्रभागा नदीकाठावरही गर्दी मोठया प्रमाणात दिसून येत होती. रविवारी पहाटेच्या सुमारास श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर व मंदिर समितीच्या सदस्य माधवीताई निगडे यांनी विठ्ठल्-रूक्मिणी मातेची महापूजा केली. महापूजा केल्यानंतर यात्रेला सुरूवात झाली. विठ्ठलाला पुरणपोळीचा नैवैद्य दाखविला जातो. आज कामदा एकादशी म्हणजे धावती यात्रा असेही संबांधले जाते.
दरम्यान, मंदिरातील विठ्ठल गाभाऱ्याला गुलाब, झेंडू, अस्टर, सुर्यफुल, शेवंती, मोगरा अशा विविध फुलांनी सजविण्यात आले आहेत. पुण्यातील विठ्ठल भक्त अमोल शेरे यांनी ही आरास केली आहे. या मनमोहक आरासामुळे मंदिर उजळून निघाले आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यातील भाविकही मोठया प्रमाणात पंढरपुरात दाखल झाले आहेत.