सोलापूरात मराठा समाजाचे चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:08 PM2018-07-21T12:08:47+5:302018-07-21T12:11:49+5:30

मराठयांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची मागणी

The Chakkajam movement of the Maratha community in Solapur | सोलापूरात मराठा समाजाचे चक्काजाम आंदोलन

सोलापूरात मराठा समाजाचे चक्काजाम आंदोलन

Next
ठळक मुद्देमराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावेआण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेधही करण्यात आला़

सोलापूर : मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा यासह आदी मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा सोलापूर शाखेच्यावतीने सोलापूरातील शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन केले़ यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेधही करण्यात आला़ या मोर्चानंतर मराठा समाजातील कार्यकर्त्यांना शहर पोलीसांनी ताब्यात घेतले़ 

मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे, मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाºया महाविद्यालयांनी मान्यता रद्द करा, राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश् काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे, आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत अशा आशयाचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने प्रशासनाला देण्यात आले़

यावेळी माऊली पवार, दिलीप कोल्हे, श्रीकांत घाडगे, प्रताप चव्हाण, दास शेळके, इंद्रजित पवार, महेश धाराशिवकर, संतोष भोसले, राम गायकवाड, राम जाधव, शेखर फंड, योगेश पवार, किरण पवार, बाळासाहेब गायकवाड, प्रकाश ननवरे, नागनाथ जाधव, वर्षा मुसळे, उषाताई राऊत, पल्लवी चवरे, लता ढेरे यांच्यासह आदी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़ यावेळी शहर पोलीसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता़ या आंदोलनामुळे शिवाजी चौकातील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती़ 

महाराष्ट्रासह भारतात शांततामयरित्या निघालेला ५८ मराठा मुक मोर्चामुळे सामाजिक जीवन ढवळून गेलेले आहे़ सर्व मराठा मोर्चामध्ये मराठा आरक्षण व मराठा कुणबी समाज एकच असल्याचा प्राधान्याने उल्लेख झालेला आहे़ मराठा समाजाने मुंबई येथे काढलेल्या ५८ व्या मुक मोर्चावेळी शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या आश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली नाही़ म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या दुसºया पर्वाला तुळजापूरातून सुरूवात झालेली असून त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास सोलापूर शहर व जिल्ह्यातील मराठा समाज बांधवानी चक्काजाम आंदोलन केले़ 

Web Title: The Chakkajam movement of the Maratha community in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.