उपरीत स्वाभिमानीचा चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:20 AM2021-03-20T04:20:42+5:302021-03-20T04:20:42+5:30
लॉकडाऊन काळात सर्व उद्योग-व्यवसाय रोजगार बंद होते.त्यानंतर महावितरण कंपनीकडून अवाच्यासव्वा घरगुती वीज बिल दिले. ते सर्वसामान्यांना भरणे शक्य झाले ...
लॉकडाऊन काळात सर्व उद्योग-व्यवसाय रोजगार बंद होते.त्यानंतर महावितरण कंपनीकडून अवाच्यासव्वा घरगुती वीज बिल दिले. ते सर्वसामान्यांना भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे किमान तीन महिन्यांचे घरगुती वीज बिल माफ करावे. तसेच शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज कपात तत्काळ बंद करून वीजपुरवठा सुरळीत करावा. थकीत ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करण्याचे साखर कारखानदारांना आदेश द्यावेत. या मागण्यांसाठी उपरी येथे पंढरपूर - सातारा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, रणजित बागल, नानासाहेब चव्हाण, नामदेव पवार, शहाजान शेख, रायाप्पा हलवर, आप्पा चोरमले, समाधान सरवदे यांच्यासह अन्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
---
विजेअभावी जळालेल्या पिकाचे पंचनामे करा
शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची ऊस, द्राक्षे, डाळिंब व नगदी पिके जळाली आहेत. त्याचे प्रशासनाने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी केली.
फोटो :
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन केल्यानंतर पंढरपूर - रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली आहे.