विठ्ठलाच्या सभामंडपात औसेकरांचे चक्रीभजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:32 AM2021-02-26T04:32:09+5:302021-02-26T04:32:09+5:30
शके १७१८ पासून आजतागायत चक्रीभजनाची परंपरा देगुलरच्या गुरुगुंडा महाराजांपासून संस्थांचे मुळ पुरुष सदगुरु विरनाथ महाराज यांना मिळाली. चक्रीभजन म्हणजे ...
शके १७१८ पासून आजतागायत चक्रीभजनाची परंपरा देगुलरच्या गुरुगुंडा महाराजांपासून संस्थांचे मुळ पुरुष सदगुरु विरनाथ महाराज यांना मिळाली. चक्रीभजन म्हणजे संसाराच्या चक्रातून, भयातून मुक्त करणारे भजन. हे भजन भजनाच्या अनेक परंपरेमध्ये काही बसून तर काही उभारुन केले जाते. हे भजन नृत्य करत केले जाते. देहाची विदेही अवस्था प्राप्त करुन देते. देगलुरच्या जवळ असणाऱ्या रामपुरच्या वनामध्ये १४ वर्ष तपशर्चया करुन प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन प्राप्त झाले. असे भजन श्री विठ्ठल मंदिरात माघ शुध्द त्रयोदशीला असते. या भजनास १५०० ते २००० वारकरी उपस्थित असतात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी शासनाने दिलेल्या नियमांनुसार हे चक्रीभजन करण्यात आले. यावेळेसचे चक्रीभजन सदगुरु गुरुबाब महाराज औसेकर यांनी केले.
यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर, सदस्य संभाजी शिंदे, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.
फोटो : २५पंढरपूर चक्रीभजन
श्री विठ्ठलाच्या सभामंडपात प्रतिकात्मक स्वरुपात गहिनीनाथ औसेकरां चक्रीभजन केले.