चळे, आंबे येथे वाळू उपशावर कारवाई ; २६ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:32 AM2021-02-26T04:32:12+5:302021-02-26T04:32:12+5:30

राजू दत्तात्रय वालेकर (वय २२, रा. दसूर, ता. इंडी, सध्या रा. आंबे, ता. पंढरपूर) व हरी शिवाजी शिंदे (रा. ...

Chale, action on sand subsidence at Mango; 26 lakh confiscated | चळे, आंबे येथे वाळू उपशावर कारवाई ; २६ लाखांचा मुद्देमाल जप्त

चळे, आंबे येथे वाळू उपशावर कारवाई ; २६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next

राजू दत्तात्रय वालेकर (वय २२, रा. दसूर, ता. इंडी, सध्या रा. आंबे, ता. पंढरपूर) व हरी शिवाजी शिंदे (रा. आंबे) यांनी भीमा नदीपात्रातील वाळूचा बेकायदा उपसा केला. ४२ हजार रुपये किंमतीची ७ ब्रास वाळूचा हरी शिंदे यांच्या शेतात साठा केला. यात वाळू उपशासाठी वापरलेला जेसीबी (क्र. एम १३ ऐजे ५७०४) व ७ ब्रास वाळू असा २२ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास पोलीस नाईक ताटे करीत आहेत.

याशिवाय चळे (ता. पंढरपूर) येथील भीमा नदीच्या पात्रातूनही वाळू चोरी होत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किरण पवार यांनी तत्काळ पथक पाठवले. यावेळी सचिन बाळासाहेब भोसले (वय २७, रा. अनवली, ता.पंढरपूर), सुधीर ऊर्फ बाळू संभाजी कांबळे (वय २५. रा. चळे), बिनू उर्फ शंकर लिंगा भोसले (रा. आंबे) हे संगनमत करुन (एम एच ०४ सी. जी. ४७७) या वाहनात वाळू घेऊन जाताना सापडले.

या कारवाईत ४ लाखांचे वाहन व ८ हजार रुपयांची १ ब्रास वाळू असा ४ लाख ८ हजार रुपयांचाद मुद्देमाल जप्त करुन तिघांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. पुढील तपास हवालदार काळे करीत आहेत.

----

Web Title: Chale, action on sand subsidence at Mango; 26 lakh confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.