चळेचे ग्रामसेवक देवकर निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:42 AM2020-12-05T04:42:43+5:302020-12-05T04:42:43+5:30
चळे ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी ९ जून रोजी ग्रामसेवक देवकर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यावरून विस्तार अधिकाऱ्यांकडे देवकर यांची चौकशी ...
चळे ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी ९ जून रोजी ग्रामसेवक देवकर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यावरून विस्तार अधिकाऱ्यांकडे देवकर यांची चौकशी दिली होती. विस्तार अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या दप्तराची मागणी केली असता देवकर यांनी तपासणीसाठी दप्तर दिले नाही. ग्रामसेवक देवकर यांनी चौदाव्या वित्त आयोगातील रकमा काढून खर्च केल्याचे दिसून आले. परंतु, ही रक्कम कोणत्या कामावर खर्च केली, त्या कामाचे मूल्यांकन, कॅशबुक, बँक पासबुक, प्रमाणके तपासणीसाठी दिली नाहीत. त्यामुळे त्यांनी या रकमेचा अपहार केला, असा ठपका ठेवून वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात आला होता. उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी ग्रामसेवक देवकर यांच्याविरुद्धचा अहवाल सादर केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी देवकर यांना तडकाफडकी निलंबित केले.