कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:09 AM2021-01-08T05:09:41+5:302021-01-08T05:09:41+5:30
विधान परिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक यंत्रणेद्वारे यशस्वीरीत्या पार पडल्याने निवडणूक विभागाला कोरोनाकाळातील निवडणुकीचा अनुभव मिळाला आहे. मात्र ...
विधान परिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक यंत्रणेद्वारे यशस्वीरीत्या पार पडल्याने निवडणूक विभागाला कोरोनाकाळातील निवडणुकीचा अनुभव मिळाला आहे. मात्र ग्रामपंचायत निवडणूक यापेक्षा वेगळी व प्रत्येक गावाचा थेट संपर्क असणारी राहणार आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेसमोर कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे आव्हानदेखील तेवढेच तगडे राहणार आहे.
या निवडणुकीशी संबंधित प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाची टक्केवारी अधिक राहत असल्याने कोरोना संसर्ग काळात निवडणुकीला कुठेही गालबोट लागू नये, यासाठी निवडणूक विभाग प्रयत्न करीत आहे.
३१० मतदान केंद्रांवर होणार मतदान
ग्रामपंचायत निवडणुकीत ३१० मतदान केंद्रांवर मतदानाला वेळी गर्दी होऊ नये, यासाठी प्रत्येक मतदान केंद्राला ७०० ते ८०० मतदार जोडले आहेत. यामुळे मतदान केंद्रांच्या संख्येत भर पडणार आहे. याशिवाय संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदार केंद्रांची माहिती घेण्यात येत असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.
कोट
निवडणूक प्रचारात प्रत्येक व्यक्तीने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. मतदानासाठी बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळून असल्यास त्यांची तपासणी करून घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
- अभिजित सावर्डे-पाटील, तहसीलदार, सांगोला